उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आंबेडकरी संघटनांकडून आदरांजली

अमरावती /28 जानेवारी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. आंबेडकरी चळवळीचे विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बुधवार(ता. 28) रोजी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉ. पी. एस. खडसे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. यावेळी डॉ. गोपीचंद मेश्राम, जगदीश गोवर्धन, सुनील रामटेके, महादेव खंडारे, रमेश रामटेके, रवींद्र शिंदे, प्रभाकर घोडेस्वार, दादासाहेब शिरसागर, दिनेश सुरपाम, सुमेर दुर्योधन, सुनील मेश्राम, बुद्धदास इंगोले, राकेश पांडे, मन खंडारे, सुरज मंडे, अनुप झगडे, जगत शहारे, प्रकाश सोनवणे, रमेश रामटेके नयन मोंढे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.




