उद्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुख्य प्रचार सभा

राकॉ महासचिव आ.संजय खोडके यांनी दिली माहिती

अमरावती /7 जानेवारी : अमरावती महानगर पालिका निवडणूक 2026 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुख्य प्रचार सभा येत्या शुक्रवार दिनांक 09 जानेवारी 2026 रोजी संत गाडगेबाबा मंदिर समोरील प्रांगण – गाडगेनगर,अमरावती येथे दुपारी 4 वाजता संपन्न होणार आहे. या प्रचारसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे उपस्थित राहून संबोधित करणार आहे. तसेच पक्षाचे आजी -माजी खासदार व आमदार तसेच वरिष्ठ नेते सुद्धा या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पक्षाचे महासचिव ( संघटन ) आ.संजय खोडके यांनी दिली आहे.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील 29 महानगर पालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. अजितदादा पवार राज्यभर जाहीर सभा व प्रचारात सहभागी असून विविध ठिकाणी त्यांच्या झंझावाती प्रचार सभांनी जोर धरला आहे. ज्याला सर्व मतदारबांधवांचा उदंड असा प्रतिसाद लाभत आहे. त्याअनुषंगानने अमरावती महानगर पालिकेच्या सर्व 22 प्रभागांतील 87 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कडून घड्याळ या चिन्हावर उभे असलेले 85 उमेदवार व दोन मित्र पक्ष (उबाठा ) चे उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे शुक्रवार 9 जानेवारी 2026 रोजी अमरावती नगरीत आगमन होणार आहे. या प्रचार सभेची महानगरात जोरात तयारी सुरु असून सर्व उमेदवार व सहकार्‍यांमध्ये सुद्धा उत्सुकता वाढली आहे. तरी सर्व सहकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व फ्रंटचे पदाधिकारी तसेच उमेदवार व समस्त मतदार बांधवानी या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे – महासचिव ( संघटन ) आ.संजय खोडके व आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button