आजचे विद्यार्थी हे उद्याचे संशोधक व उद्योजक
विद्यापीठाच्या ज्युनियर हॅकेथॉनमध्ये विजेत्या विद्याथ्यार्ंना पुरस्कार

* प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांचे प्रतिपादन
अमरावती /9 डिसेंबर : आजचे विद्यार्थी हे उद्याचे संशोधक आणि उद्योजक आहेत आणि अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील इन्क्युबेशन फाऊंडेशन, आय.क्यू.ए.सी. व मेधावाटिका अॅडलॅब्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्याथ्र्यांकरिता आयोजित ज्युनियर हॅकेथॉनमध्ये विजेत्या विद्याथ्र्यांच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता अमरावतीचे उपायुक्त श्री. द. ल. ठाकरे, इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी सर्व विद्याथ्र्यांचे अभिनंदन करुन पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात. ज्युनियर श्रेणीमध्ये श्री समर्थ हायस्कुल, अमरावतीचे विद्यार्थी समर्थ देवगिरीकर, तुषार सोपान काजे यांना प्रथम व 3 हजार रुपये रोख, शिवाजी मल्टीपर्पज उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी अद्वेता चौधरी, सोहम माहुलकर द्वितीय व 2 हजार रूपये रोख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, पिंपरी ता. चांदूर बाजारचे विद्यार्थी भावेश गोपाल सोसे, नमन सोनारे, आदित्य तायडे यांना तृतीय बक्षीस व एक हजार रूपये रोख स्व.गणुजी बापुजी भोकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदान करण्यात आले. सिनियर श्रेणीमध्ये मणिबाई गुजराती हायस्कुलचे विद्यार्थी ओम देशमुख, समर्थ विधाते, श्रावण कोंडे यांना प्रथम बक्षीस व 3 हजार रूपये रोख, शिवाजी मल्टीपर्पज उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी प्रेम च-हाटे द्वितीय व 2 हजार रूपये रोख, गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कुल, दिग्रसचे विद्यार्थी अर्जून दूधाने, अजय राठोड, अर्थव रुद्राक्षवर यांना तृतीय व एक हजार रूपये रोख स्व. श्री. अशोकराव हिरूळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदान करण्यात आले. तर प्रोत्साहनपर बक्षिस शाश्वत कन्सेप्ट स्कुलचे विद्यार्थी एकांश गवई, भव्य डेंबला यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव, व्यवस्थापक अमोल हिरुळकर, नरेश मोवाळे, रवी ढेंगळे, प्रशिक्षणार्थी भावेश वारके, प्रज्वल वानखडे, कोमल काळबांडे, मेघवाटिकाचे डॉ. केतकी कालेले, राहुल चूटे यांनी अथक परिश्रम घेतले.




