आज विद्यापीठाच्यावतीने ‘जीवनाचे प्रभावी व्यवस्थापन’ कार्यशाळा
श्रीरामकृष्ण विवेकानंद समितीचा संयुक्त उपक्रम

अमरावती /16 डिसेंबर : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र आणि श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्याथ्र्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्याची वाढ करण्याच्या दृष्टीने ‘जीवनाचे प्रभावी व्यवस्थापन’ या महत्वपूर्ण विषयावर दि. 18 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती, विवेकानंद कॉलनी, अमरावती येथे एकदिवसीय युवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून श्रीरामकृष्ण मिशन, वडोदरा, गुजरात येथील श्रीमत स्वामी अनंतरानंद यांचे शुभहस्ते युवा कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न होईल. कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे व सिम्बॉसिस महाविद्यालय, पुणेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. शिरीष लिमये उपस्थित राहतील.




