आतंकवाद्यांना उत्तर देण्यास घरोघरी शिवाजी महाराज जन्मणार

सांस्कृतिक कार्यमंत्री कपिल मिश्रा यांचे प्रतिपादन; शंख नाद महोत्सवाच्या उद्घाटनात हिंदुत्व निष्ठांचा सहभाग

अमरावती /15 डिसेंबर : समाजातील आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठा बळकट होण्याचा संदेश दिला. आतंकवाद्यांना उत्तर देण्यासाठी घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. असे प्रतिपादन मंत्री कपिल मिश्रा यांनी केले. दिल्ली येथे भारत मंडपम्मध्ये आयोजित सनातन राष्ट्र शंख नाद महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात दिल्लीचे सांस्कृतिक कार्यमंत्री कपिल मिश्रा यांनी आतंकवाद विरोधात भूमिका मांडली आहे.
‘भारत मंडप’ येथे ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंख नाद महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाच्या प्रारंभी रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. शंख नाद आणि वेदमंत्र पठण झाल्यानंतर शांति गिरी महाराज, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, बिंदा सिंगबाळ आणि अंजली गाडगीळ, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशनचे अध्यक्ष उदय माहूरकर, पत्रकार सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी समारंभात सनातन संस्था निर्मित संकल्प रामराज्य का या हिंदी ग्रंथाचे, तर संरक्षण मंत्रालयाचे अपर सचिव वेदवीर आर्य लिखित क्रॉनोलॉजी न्ड ओरिजिन्स ऑफ इंडो युरोपियन सिविलाइजेशन या इंग्रजी पुस्तकाचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button