राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आ.राणा बसपा व वंचित सोबत मोट बांधण्याच्या प्रयत्नात

अमरावती /16 जानेवारी – अमरावती महापालिका निवडणूकीचे निकाल धक्कादायक लागले असून भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये अनेक महापालिकेत सत्ता मिळाली असतांना अमरावतीत भाजपाच्या बाजुने स्पष्टपणे जनादेश आलेला नाही. भारतीय जनता पक्षाचे 25 नगरसेवक निवडून आले असून त्या खालोखाल युवा स्वाभिमान पक्षाचे 15 नगरसेवक निर्वाचीत झाले आहे.
युवा स्वाभिमान सत्तेचा भागीदार होण्यासाठी आ. रवी राणा यांनी हालचाल सुरु केली आहे. रवी राणांनी भाज पाला समर्थन देणारा एक स्वतंत्र गट स्थापन कर ण्याचा निर्णय घेत ल्याचा अत्यंत विश्वासू सुत्रांनी माहिती दिली आहे. बसपाच्या प्रदेशाध्यक्षानी रवी राणा यांच्याशी संपर्क साधला असून स्वाभिमानला पाठींबा देण्याचा शब्द त्यांनी दिल्याचे बोलल्या जात आहे. रवी राणा स्वाभिमान पक्षासोबत बसपा, शिंदे सेना, उबाठा आणि वंचीत या सर्वांची मोट बांधण्याचा विचार करीत असून 24 नगरसेवक एकत्र आणण्याचा त्यांचा माणस होता. मात्र ही बाब शक्य होतांना दिसत नाही. प्रारंभी बसपा-3, शिंदे सेना -3, वंचीत-1 यांना एकत्र आणण्याचा विचार चालवला होता. मात्र शिंदे सेनेचा निर्णय खुद्द एकनाथराव शिंदे आणि आनंदराव अडसुळ घेणार असून रवी राणा यांनी बसपा आणि वंचीत यांना एकत्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दिशेने त्यांनी चर्चा सुरु केली असून स्वाभिमानच्या 15 नगरसेवकां सोबत 4 नगरसेवकांची जोड देवून 19 नगरसेवकांचा स्वतंत्र गट रवी राणा तयार करण्याच्या मनस्थितीत आहे. 19 नगरसेवकांनी भाजपाला पाठींबा द्यायचा अस नियोजन चालू असतांना 44 नगरसेवकाच्या पाठींब्याने भाजपाचा महापौर होण्याची दाट शक्यता आहे. शिंदे गटाचा पाठींबा भाजप नेतृत्व सहज मिळवणार असुन 47 नगरसेवकांची सत्ता महापालिकेत स्थापन करण्याचे नियोजन सुरु आहे. एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार भाजप पक्षश्रेष्ठींनी रवी राणांच्या योजनेला सहमती दर्शविली असून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेमध्ये सहभागी करुन घेवू नये असा विचार प्रवाह भाजपामध्ये प्रभावी होत आहे. मात्र भाजपातल्या स्थानिक नेत्यांच्या एका गटाचे आ.संजय खोडके यांच्याशी असलेले मधुर संबंध बघता भाजपातला खोडके मित्र परिवार गट सक्रीय झाला असून काही झाले तरी राणांशी युती होवू द्यायची नाही अशी एकूण मोर्चेबांधणी सुरु आहे. आ. संजय खोडके यांनी यापूर्वीच असे जाहीर केले आहे की, स्वाभिमान सत्तेचा भागीदार असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सोबत राहणार नाही. सर्व पक्षाची ताकद बघता भाजपाला बहुमत न मिळाल्याने स्वाभिमान की राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही पर्याय खुले असतांना स्वाभिमानला सोबत घेण्यासाठी भाजपाचे नेतृत्व सकारात्मक असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे रवी राणा भाजपाची सत्ता स्थापन करण्यामधे महत्वाची भूमिका बजावू शकतात.

संबंधित बातम्या

Back to top button