सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणार्या तिघांना अटक
चादुर रेल्वे पोलिसांची कारवाई

चांदुर रेल्वे / 17 जुलै : धामणगाव रेल्वे मार्गावर सार्वजनिक जागेत जुगार खेळत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 52 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चांदुर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धामनगाव रेल्वे मार्गावर चर्चच्या मागे खुल्या जागेवर काही लोक जुगार खेळत आहे, अशी माहिती चांदुर रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांच्या एका पथकाने याठिकाणी धडक दिली. तीघेजण गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळन रोख 2,970 रुपये, तीन मोबाईल, दोन दुचाकी असा 1 लाख 52 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मनिष रतनलाल उपाध्यायं (40, रा. वकील लाईन, चांदुर रेल्वे), संतोष शिवनाथ केशरवानी (36, रा. आठवडी बाजार, चांदुर रेल्वे) आणि प्रफुल्ल राजु वासनिक (36, रा. शिक्षक कॉलनी, चांदुर रेल्वे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय आकरे, उपनिरिक्षक नंदलाल लिंगोट, पोलीस अंमलदार शिवाजी घुगे, प्रविण मेश्राम, राहुल इंगळे, प्रशांत ढोके, संदीप वासनिक यांनी केली.




