भावनेपेक्षा कर्तव्याला आणि विकासाला प्राधान्य देण्याची हीच योग्य वेळ
आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन

* चपराशीपुरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा गजर
अमरावती /11 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री – नामदार अजितदादा पवार यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारं आहे. त्यांचं शिस्तप्रिय आणि कृतिशील नेतृत्व, सकारात्मक निर्णयक्षमता, लोकांशी थेट संवाद आणि प्रशासनावरची मजबूत पकड ही कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नव्या रूपात विस्तार होत आहे. त्यांची ओळख आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श निर्माण करते.
अजितदादा पवार यांच्या कार्यकुशल व कल्पक नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमरावती महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जातोय. महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता अवघे काही दिवसच शिल्लक असल्याने राजकीय हालचालींनी वेग घेतला असून आमदार – सौ. सुलभाताई खोडके व आमदार – संजय खोडके यांनी प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सोबत घेऊन सर्वसामान्यांशी भेटीगाठी, चर्चा, संवाद, परामर्ष,वैचारिक मंथन, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन प्रचारात सहभाग नोंदवला आहे. अशातच नुकतेच प्रभाग क्रमांक- 8 जोग स्टेडियम – चपराशिपुरा स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. यावेळी प्रचार कार्यालयाचे फीत कापित आ.सुलभा खोडकेंनी उदघाटनाची औपचारिकता साधली. अमरावती शहराचा विकास करताना आम्ही कधीही भेदभाव करत नाही. अमरावतीच्या जनतेचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. लोकशाही ही केवळ मतदानाची यांत्रिक प्रक्रिया नसून ती मूल्यांची, नैतिकतेची आणि सामाजिक जवाबदारीची संस्कृती आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला केवळ शासन पद्धती मानले नाही, तर ती जीवनपद्धती असल्याचे अधोरेखित केले.सामान्य मतदाराने एक गोष्ट प्रकर्षाने आणि गांभीर्याने लक्षात घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार हा केवळ कागदावरचा शिक्का किंवा मशीनवरचे बटन नसून, ती आपल्या भविष्यातील पाच वर्षांच्या प्रगतीची ’ गुरुकिल्ली ’ आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. नागरिक निर्भयपणे मतदान करतात, आपला प्रतिनिधी निवडतात आणि सत्तेला प्रश्न विचारतात, याच प्रक्रियेतून लोकशाही प्रगल्भ होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर लोकशाहीचा पाया मानल्या जातात. शहराचा कारभार, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या दैनंदिन प्रश्नांवर निर्णय घेणार्या महानगरपालिकांची निवडणूक ही विकासाची दिशा ठरवणारी असते. दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी येणारी महानगरपालिका निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडण्याची औपचारिक प्रक्रिया नाही, तर ती आपल्या लोकशाही आत्मसन्मानाची कसोटी आहे. ही निवडणूक आपल्या अमरावती शहराची भावी दिशा ठरवणारी आहे. आपल्या मुलांच्या उद्याचा निर्णय घेणारा क्षण आहे.याकडे लक्ष वेधित मी आपणास विनंतीपूर्ण आवाहन करते की 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाचा हक्क बजावताना सर्व नागरिकांनी घड्याळ चिन्हाचे बटन दाबून जोग स्टेडियम – चपराशिपुरा प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना विजयी करून लोकसेवेची संधी द्यावी. असा मानस व्यक्त करीत श्रीमती सुहासिनी अंबादास जावरे, रामचरण चव्हाण, सौ. स्वाती सचिन निकम, मुमताज शेख राजाभैय्या ( केबलवाले ) यांनी सर्व नागरिकांना मतदानरुपी आशीर्वाद देण्याची विनंतीपूर्ण आवाहन केले. याप्रसंगी यश सुलभा संजय खोडके यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, युवक – युवती प्रामुख्याने उपस्थित होते.




