तिसरे परिवर्तन विचारवेध जिल्हा साहित्य संमेलन 20 व 21 डिसेंबर रोजी

अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांची निवड तर

सुदर्शन गांग उद्घाटक, स्वागताध्यक्षपदी डॉ.श्यामसुंदर निकम

अमरावती/14 नोव्हेंबर – मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ,मुंबई यांच्या अनुदानातून आयोजित तिसरे परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन 20 व 21 डिसेंबर 2025 रोजी अभियंता भवन, शेगाव नाका अमरावती येथे होणार असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक, शेतकरी आंदोलक तथा समाजसेवक चंद्रकांत वानखडे हे असतील अशी माहिती या संमेलनाच्या मुख्य आयोजक डॉ. शोभाताई रोकडे यांनी दिली.
रविवार दि.9 डिसेंबर 2025 रोजी अभियंता भवन अमरावती येथे झालेल्या आयोजन समितीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते साहित्य संमेलन विषयक नियोजनाबाबत चर्चा होऊन संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक,शेतकरी आंदोलक तथा समाजसेवक चंद्रकांत वानखडे यांच्या नावावर शिक्कामोर्तंब करण्यात आले. चंद्रकांत वानखडे हे महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या चळवळीतील प्रमुख कार्यकर्ता आहेत. त्यांचा तरुण शांती सेना या बिहार येथील भीषण दुष्काळाकरिता स्थापन करण्यात आलेल्या चळवळीत सहभाग होता. 1975च्या आणीबाणीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनी या संघटनेचे कार्यकर्ता म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा या खेडेगावात 20 वर्षे वास्तव्य केले. तेथे त्यांनी शेतकरी व शेतमजुरांच्या हक्कासाठी विविध आंदोलने केली. ’शेतकरी आत्महत्या’, ’एका साध्या सत्यासाठी’, ’असे छळले राजबंद्याना ’, ’आपुलाची वाद आपणांसी’ व ‘गांधी का मरत नाही’ इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहिष्णुता, धार्मिक ध्रुवीकरण आणि लोकशाही संस्थांची मोडतोड या प्रश्नांवर चंद्रकांत वानखडे यांनी परिवर्तनवादी भूमिका घेतली. त्यामुळेच गांधीहत्येच्या संदर्भात ‘गांधी का मरत नाही’ या पुस्तकाने गांधींबद्दलचे नवे संभाषित रुजविण्यात चंद्रकांत वानखडे यांना बर्‍यापैकी यश आले. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवी,अनाथ निराधारांचे आधार,राष्ट्रीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष मा.सुदर्शनजी गांग जैन यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून कथा,कादंबरीकार,स्तंभलेखक व माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम यांची निवड करण्यात आली आहे.
यासंमेलनात ग्रंथदिंडी,प्रकट मुलाखत,परिसंवाद,वर्‍हाडी कविसंमेलन,निमंत्रितांचे दोन कविसंमेलने,कथाकथन,बालकविसंमेलन व ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा.अशी भरगच्च मेजवानी मिळणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्याने भव्य कथा व काव्यस्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट तीन क्रमांकांना संमेलनात रोख रक्कम व प्रशस्तिपत्रकासह सन्मानीत करण्यात येईल.तसेच समाजसेवा,साहित्य, कला, आरोग्य व पत्रकारिता या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या नामवंतांना परिवर्तन पुरस्काराने गौरविण्यात येणार आह.याशिवाय विविध नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकांचे विमोचन देखील करण्यात येणार आह.
साहित्य संमेलनाच्या आयोजन व नियोजनाबाबत पार पडलेल्या या बैठकीला परिवर्तन प्रबोधिनीच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मुख्य संयोजिका प्राचार्य डॉ. शोभाताई रोकडे,प्रमुख सल्लागार,इंजि.वा.पां.जाधव,इंजि.श्री दीपक दारव्हेकर,इंजि.आबासाहेब कडू, कांचनताई उल्हे,डॉ.राजेंद्र राऊत,प्रभाताई आवारे, ,संजीवनी काळे, कृष्णा पाळेकर,ऍड.डॉ.सुरेश चापोरकर, प्रा.डॉ शुभांगी इंगोले,तसेच आयोजन समिती प्रमुख सदस्य ,विशाल मोहोड, खुशाल गुल्हाने,गजानन काकडे, विशाल कन्हेरकर,रंजना कराळे, डॉ. मंदा नांदुरकर,शीतल राऊत, संदीप देशमुख, डॉ.आशय रोकडे,डॉ. अक्षय उताणे ,नयन पर्‍हाड व बिलिव्ह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.या सभेचे अध्क्षस्थान डॉ.शोभा रोकडे यांनी भुषवले तर आभार श्री विशाल मोहोड यांनी मानले.

 

संबंधित बातम्या

Back to top button