महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

अमरावती /19 फेब्रुवारी : गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी,2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. या निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवाणी यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमानंतर शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला महापौर श्रीचंद तेजवाणी यांचे हस्ते हारार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, गटनेता चेतन गावंडे, गटनेता अविनाश मार्डीकर, सन्मा.नगरसेवक प्रमोद महल्ले, सन्मा.नगरसेविका सौ.सुरेखा लुंगारे, सौ.कल्याणी तायडे, ममता आवारे, मरियम बानो मोहम्मद ईस्माईल रारानी, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, नगरसचिव संदिप वडुरकर, उद्यान अधिक्षक अजय विंचुरकर, अभिलेखागार नंदकिशोर पवार, कार्यालय अधिक्षक गुलशन मिरानी, उपअभियंता प्रमोद इंगोले, हेमंत महाजन, उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी, मुकेश खारकर, सुनिता गुर्जर, विपीन त्रिवेदी, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, शुभम पंधे, शुभम वानखडे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button