विद्यापीठातील वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

अमरावती /14 जानेवारी – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ’आजीवन अध्ययन व विस्तार विभाग’ आणि ’एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी ‘राजमाता जिजाऊ यांची विचारधारा व संस्कारांची आजच्या समाजातील उपयुक्तता’, ‘राजमाता जिजाऊ : स्त्री नेतृत्वाचा ऐतिहासिक आदर्श’ आणि ‘स्वराज्य निर्मितीतील जिजाऊंचे मातृत्व व नेतृत्व’ असे तीन विषय ठेवण्यात आले होते. स्पर्धक विद्याथ्र्यांनी तीनही विषयांवर अत्यंत प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि भावनिक मांडणी करत मॉ जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले. प्रथम पुरस्कार साक्षी पवार हिला 5001, द्वितीय प्रतिक्षा दापूरकर हिला 4001, तृतीय मनश्री अढाऊ 3001, चतुर्थ पुरस्कार तन्वी मानकर हिला 2001 व उत्तेजनार्थ 1001 रु. चा पुरस्कार कु. पल्लवी नेरकर या विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करुन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण डॉ. वैभव मस्के, प्रा. अभिजित इंगळे, डॉ. मनिषा इंगलकर, प्रा. पुजा अलोणे व श्री प्रफुल्ल कुबडे यांनी केले. याप्रसंगी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील तसेच परिक्षक डॉ. वैभव मस्के, प्रा. अभिजित इंगळे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. आदित्य पुंड, तर आभार डॉ. अनघा देशमुख यांनी मानले. स्पर्धेला विद्याथ्र्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

संबंधित बातम्या

Back to top button