भटक्या कुत्र्यांची नसबंदी उपाययोजना ठरली फार्स

वर्षभरात 24 हजारांपेक्षा अधिक नागरीकांना घेतला चावा

महानगरपालिकेच्या उपाययोजनेला मुहूर्तच गवसला नाही

अमरावती / 8 फेब्रुवारी – शहरात व जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 24 हजाराच्यावर नागरीकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर सरकारी रुग्णालयात उपचार घेतले जात आहेत. या घटनांमध्ये उपचारादरम्यान एका नागरीकाचा मृत्यु झाल्याचीही नोंद इर्वीन रुग्णालयात झाली आहे. दरम्यान यावर उपाययोजना म्हणून महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची उपाययोजना जाहीर केली होती. मात्र या उपाययोजनेचा अजुनपर्यंत तरी मुहूर्त गवसला नसल्यामुळे ही घोषणा केवळ फार्स ठरली का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची प्रचंड संख्या वाढली असुन या भटक्या कुत्र्यांचे वास्तव मुख्य रस्ते, चौक आणि वसाहतीमध्ये अजुन दुचाकी स्वार व पादाचार्‍यांवर कुत्रे हल्ले करतात. मात्र कुत्र्याच्या चावल्यामुळे रेबीज सारख्या आजाराचा धोका निर्माण होत असल्यामुळे याची चांगली दहशत नागरीकांमध्ये असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे कुत्र्यासोबतच मांजरे व माकडे यांनी नागरीकांवर हल्ला केल्याच्या 2 हजाराच्या वर घटना घडलेल्या आहेत. त्यामूळे आता यावर तातडीने उपाययोजना करुन ज्या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आहे त्या भागात आता कुत्र्यांकडून सावधान असे फलक लावून जनजागृतीची गरज आहे.
मनपात पदस्थापनेसाठी जोरदार लॉबींग-मनपात प्रशासक राज संपुन आता महापौर व उपमहापौर विराजमान झाले आहेत. त्या पृष्ठभूमिवर आयुक्तांच्या सुचनेवरून तब्बल 20 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांची गोपनीय फाईल अंतीम करण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. तसेच महत्वाच्या विभागातील सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अधिकारी व खाते प्रमुखांच्या प्रस्तावित बदल्यांमध्ये समावेश झाला आहे. तर काही अधिकार्‍यांनी पदस्थापनेसाठी जोरदार लॉबींग केली असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

Back to top button