आकाशवाणीवर होय मी सावित्री बोलतेय.. व…आम्ही सावित्रीच्या लेकी.. कार्यक्रम

अमरावती /1 जानेवारी : बालिका दिन म्हणजेस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने 3 जानेवारीला आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित हृदयस्पर्शी एकपात्री संवाद कार्यक्रम होय मी सावित्री बोलतेय सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा, स्त्रीशिक्षणासाठी दिलेल्या संघर्षाचा आणि समाजपरिवर्तनाच्या विचारांचा प्रभावी संदेश श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले स्वतः समाजाशी संवाद साधत असल्याचा अनुभव देणारी सादरीकरण शैली वापरण्यात आली असून, स्त्रीसक्षमीकरण, बालिकांचे हक्क आणि शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर संवेदनशील व प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे लेखन व निवेदन वैशाली ढाकुलकर यांनी केले असून तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांनी दिले आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे हे आहेत.हा समन्वित कार्यक्रम शनिवार, 03 जानेवारीला सकाळी 11.30 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून एकाच वेळी प्रसारित होणार आहे. तसेच याच दिवशी या कार्यक्रमाआधी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी स्थानिक आकाशवाणी केंद्रावरून आम्ही सावित्रीच्या लेकी..हा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे.या कार्यक्रमाचे सादरकर्ते कार्यक्रम अधिकारी भैय्यालाल टेकाम तथा रूपकाचे लेखन शारदा वाघुळे यांनी, तर अभिवाचन निवेदिका शामली देशमुख यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button