संगीत साधना कराओके क्लब व लॉयन्सक्लबतर्फे नववर्षाचे जल्लोषात स्वागत

अमरावती /8 जानेवारी : संगीत साधना कराओके क्लब, अमरावती तसेच लॉयन्स क्लब ऑफ अमरावती प्रीमियम यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या स्वागतासाठी हॅपी न्यू इयर 2020 – प्यार जिंदगी है या कराओके गीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जोशी हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात संगीत, गायन आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई, लायन्स डॉ. लक्ष्मीकांत राठी, यूएसएमध्ये वास्तव्यास असलेल्या वर्हाडी रील्समेकर डॉ. मिथिला गावंडे, लायन्स डॉ. मनीष दारा, लायन्स रोहित खुराना, श्री. विनय तन्ना व सौ. श्वेता तन्ना, आशिष पेठे, तेजस अंबाडकर उपस्थित होते. कार्यक्रमातील स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी वेशभूषेसाठी रविषा तनेजा व चैताली चर्जन यांनी, तर गायनासाठी भक्ती संगीत क्लासचे संचालक श्री. महेशजी खिरैय्या यांनी सांभाळली. स्पर्धेत उत्कृष्ट वेशभूषेसाठी मुकेश राजदेव, दीक्षा राठोड, प्रमोद काळसर्पे, डॉ. वासंती कडू, नीलिमा देशमुख, एकांश आचार्य, प्रभुदास फंदे, लीना मनोहर, वृषाली काळे, सुधाकर महाजन व सुनीता व्यास यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर उत्कृष्ट गायनासाठी देवेंद्र ठाकरे, सागर जायदे, मंजुषा साबळे, किशोर अंबुलकर, अमृता वाठोडकर, संगीता ठाकरे, अजय देशमुख, प्रमोद चव्हाण, नीलिमा दांडगे व दीपक खरे यांना गौरविण्यात आले.




