न्याय हक्कासाठी लढा देण्याची गरज
सेंट्रल सर्किट सिने असोसिएशनचे 72 वे अधिवेशनाचे उद्घाटन

* अध्यक्ष जैन यांचा सर्वांना एकजुट राहण्याचा सल्ला
* राजकमल टॉकीज मध्ये चार राज्यांतील सिनेमा संचालक सहभागी
अमरावती /27 ऑक्टोबर – सिंगल-स्क्रीन थिएटर वाचवण्यासाठी सरकार आणि प्रशासनाविरुद्ध निर्णायक लढाई लढण्याची तयारी सेंट्रल सर्किट सिने असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष लोकेंद्र जैन यांनी सर्व सदस्यांना एकजुट होण्याचे आणि लढ्यास पाठींबा देण्याचे आवाहन केले. स्थानिक राजकमल टॉकीज येथे झालेल्या असोसिएशनच्या 72 व्या अधिवेशनात सदस्यांनी उपस्थित केलेल्या समस्या आणि आव्हानांवर त्यांनी मार्गदर्शन केले. अधिवेशनासाठी चार राज्यांमधून शेकडो सदस्य आणि पदाधिकारी अमरावती येथे दाखल झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामकिशन कासट उपस्थित होते, तसेच व्यासपीठावर उपाध्यक्ष वसंत कुमार लड्ढा, कोषाध्यक्ष दिलीप लुनिया (जगदलपूर), सरचिटणीस कैलाशचंद्र शर्मा (जयपूर), सचिव सचिन पुरोहित (इंदूर) आणि सीसीसीचे डायरेक्टर कमल कासट उपस्थित होते. नरेश चौधरी आणि इतर मान्यवर सुद्धा या अधिवेशनात सहभागी झाले.
वितरकांनी सिनेमागृहांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. सरकारकडून ओशासने देऊनही थिएटरना औद्योगिक दराने वीज पुरवठा केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर माहिती देताना अध्यक्ष लोकेंद्र जैन यांनी सांगितले की, सर्व सदस्यांनी एकजुट होऊन शासनाकडे आपल्या व्यथा मांडण्याची गरज आहे. संघटनेने एकजुट राहून शासनावर आपल्या न्यायहक्कासाठी दबाव आणला पाहिजे, तरच देशभरातील व्यवसायिकांना न्याय मिळेल. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि खानदेशमधील सदस्य आणि पदाधिकारी या अधिवेशनाला उत्साहाने उपस्थित होते.
या अधिवेशनात उमेश उपाध्याय (वर्धा), सुनील चौधरी (जयपूर), अब्दुल रौफ (मुंबई), संदीप भंडारी (जयपूर), लखपत भंडारी (जयपूर), कृष्णकुमार अग्रवाल (जयपूर), वासुदेव चाचान (जयपूर), बिनेश शाह (इंदूर), रमेश भंडारी (श्रीगंगानगर), रामनगरवाल (श्रीगंगानगर), राजेंद्रकुमार (जयपूर) यांचा समावेश होता. तसेच वसंत लड्ढा (इंदूर), अशोक जैन (इंदूर), प्रग्नेश ओझा (इंदूर), रमेशचंद्र शर्मा (जयपूर), अनिल साबू (उज्जैन), जुगलकिशोर गट्टानी, लक्ष्मीकांत झंवर, आझाद लड्ढा, रंगनाथ चांडक, अनिल राठी, शारंग चांडक, विनोद भंडारी, राहुल भंडारी, पी. जवंजाळकर, प्रशांत महल्ले, निखिल सोलीव, प्रकाश भंडारी, कमलेश दोंदळकर (सर्व अमरावती), नीलेश पटेल (बरवणी), धर्मेंद्र सक्सेना (इंदूर), संजय सेठी (सोनकच्छ), विनय शेरेकर (इंदूर), संतोष अग्रवाल (जयपूर), सौरभ पोटदुखे (चंद्रपूर), अब्दुल जान मोहम्मद गिलानी (यवतमाळ), पुलकित भंडारी (श्रीगंगानगर), दिलीप शर्मा (जयपूर), तरुण सोनी (रामानगर), रामनाथ पाटील (रानापूर), बिरबल शिवहरे (बुर्हाणपूर), मोहित जैन (रतलाम), विवेक मालवीय (बैतूल), श्याम पाटील (यवतमाळ) आदींसह अनेकजण उत्साहाने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अनिल राठी यांनी केले.




