सर्वांना समान न्याय मिळण्यासाठी संविधानाची गरज

डॉ.रघुनाथ वाडेकर यांचे प्रतिपादन

अमरावती /5 डिसेंबर : भारताला स्वातंत्र्यानंतर देश समता-बंधुता-एकता-समान न्याय या तत्त्वावर चालविण्याकरिता घटना आवश्यक होती. सदरची राज्यघटना लिहून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संदेश दिला तो आज प्रत्येक भारतीयांनी अंगीकारणे जरुरीची आहे . एवढेच नव्हे तर जगाच्या पाठीवर एवढा मोठा लोकशाही प्रधान देश हा फक्त राज्यघटनेमुळेच व्यवस्थित चालत असल्याचे मत वाडेकर नॅशनल स्कूल गुरुकुंज मोझरी चे डायरेक्टर सचिव डॉ.रघुनाथ वाडेकर यांनी व्यक्त केले. ते वाडेकर नॅशनल स्कूल येथे संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी भारताच्या संविधानाचे वाचन शिक्षिका मुक्ती बाभुळकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शिक्षिका सारिका डहाके उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी संविधानावर प्रकाश टाकणारी भाषणे दिलीत. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका दिपाली पखाले यांनी, प्रास्ताविक सुजित काळमेघ सर यांनी तर आभार प्रदर्शन स्वराली राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या शिक्षिका सर्वश्री मुक्ती बाभुळकर, अश्विनी खैरकर, सारिका डहाके, प्रतीक्षा यावले, प्रवीना रामावत यांनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button