महानगरपालिकेतर्फे प्रा.राम मेघे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये नव मतदारांना मतदानाची शपथ

नववर्षाच्या प्रारंभीच लोकशाही बळकटीसाठी पुढाकार

अमरावती /1 जानेवारी : महानगरपालिकेतर्फे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. गुरुवार दि. 01 जानेवारी 2026 रोजी प्रॉ. राम मेघे कॉलेज, अमरावती येथे नव मतदारांसाठी भव्य मतदान शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 18 वर्षे पूर्ण करून प्रथमच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या युवक-युवतींना मतदानाची शपथ देण्यात आली.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मतदान प्रक्रियेत तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा, तसेच मतदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित नव मतदारांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व सांगण्यात आले. मतदान हा केवळ हक्क नसून ती एक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे व विवेकबुद्धीने मतदान करून सक्षम व जबाबदार लोकप्रतिनिधी निवडले पाहिजेत, असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता, स्वच्छ व पारदर्शक लोकशाही प्रक्रियेस हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदान यंत्रांचा वापर, निवडणूक आयोगाची भूमिका आणि संविधानिक कर्तव्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात मतदानाची शपथ घेतली व लोकशाहीच्या मजबुतीसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, अमरावती महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नववर्षाच्या सुरुवातीलाच राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे तरुण पिढीत मतदानाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल, तसेच आगामी निवडणुकांमध्ये मतदार सहभाग वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अमरावती महानगरपालिकेचा हा उपक्रम लोकशाही सुदृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत असून, भविष्यातही अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास श्रीमती शिल्पा नाईक अतिरिक्त आयुक्त मनपा अमरावती र्ीींशशि श्रिरप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम,झठचखढठ बडनेरा जुने मेघे कॉलेज प्राचार्य डॉ. गजेंद्र बामणोटे, झठचउए-च्, बडनेरा नवीन प्राचार्य डॉ.अजय ठाकरे, प्राध्यापक विजय काळे, डॉ. किरण डोंगरे, सहा.कार्यक्रम अधिकारी पंकजकुमार सपकाळ, कैलास कुलट विशेष शिक्षक हे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button