संत श्री गजानन महाराजांच्या चमत्कारांनी व शिकवणीने अनेक भक्तांचे जीवन उजळले

आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

* श्री गजानन महाराज यांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळ्यात भावीकांची मांदियाळी

अमरावती /28 डिसेंबर : श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत होते, जे 1878 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे प्रकट झाले आणि त्यांच्या चमत्कारांनी व शिकवणीने अनेक भक्तांचे जीवन उजळले, विशेषतः श्री गजानन विजय या ग्रंथातून त्यांचे चरित्र आणि लीला ( कार्यें )सांगितल्या जातात, ज्याचे लेखन श्री. दासगणू महाराज यांनी केले आहे आणि त्यांच्या कार्यामुळे शेगांव हे एक मोठे तीर्थक्षेत्र बनले आहे.
संत गजानन महाराजांनी अनेक भक्तांना त्यांचे दर्शन देऊन, मार्गदर्शन करून आणि चमत्कार करून जीवन बदलले. ते आपल्या लीलांनी भक्तांना आध्यात्मिक मार्गावर आणत असत. थोडक्यात गजानन महाराज हे एक दैवी व्यक्तिमत्व होते. ज्यांनी भक्ती आणि साधेपणाचा संदेश दिला आणि महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेत एक महत्वाचे स्थान निर्माण केले. श्री संत गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री. दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्याचे नाव श्री गजानन विजय असे आहे, या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात. असे प्रतिपादन आ. सुलभा खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी शेगांव – रहाटगाव – कठोरा मार्ग परिसर समीपस्थ मनीषा कॉलनी स्थित श्री हनुमान मंदिर परिसरात आयोजित श्री संत गजानन महाराज यांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहोळ्यात त्या बोलत होत्या. सर्वप्रथम आ.सुलभाताई संजय खोडके यांनी ब्रह्मांडनायक संत श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेस पूजन – वंदन – माल्यार्पण करीत श्रींचे कृपाशीर्वाद घेतले. तसेच यावेळी सर्व भावीकभक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांनी श्रींचे चरणी प्रार्थना केली. व्यासपीठ ग्रंथ वाचक – हरिभक्तपरायण सौ. हेमाताई कराळे यांच्या सुमधुर वाणीतून आपले विचार आणि कृती यांच्यातील संगती हेच खरे संतुलन आहे. या शब्दांत उपस्थित भावीकभक्तांनी श्री. गजानन विजय ग्रंथ सामूहिक पारायण श्रवणाचा लाभ घेतला. याप्रसंगी आयोजकांच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात जवळपास 400 महिला भगिनींनी पारंपरिक वेशभूषा धारण करीत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहोळ्यात सहभाग नोंदवला होता. सामूहिक पारायण सोहोळ्यात सहभागी भाविक भक्तांसाठी आयोजकांच्या वतीने आसन व्यवस्था, पेयजल सेवा उपलब्धता करण्यात आली होती.यावेळी भाविकभक्तांनी श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सचिदानंद भक्तप्रतिपालक शेगांव निवासी श्री समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय चा एकसुरात भव्य जयघोष करण्यात आला होता. याप्रसंगी मनीषा कॉलनी येथील व आजूबाजूच्या परिसरातील महिला भगिनींच्या वतीने शाल – श्रीफळ – पुष्पगुच्छ देऊन आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांचा स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला. भक्ती, ज्ञान आणि आनंदाचा अनमोल खजिना….. संबोधल्या जाणार्‍या श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण अध्यात्मिक सोहोळ्याच्या समारोपीय क्षणानंतर उपस्थित सर्व भावीकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. विद्या बद्रे, पुष्पा खडके, माया पवार, रजनी शहापुरे, उज्वला घोंगडे,संपदा पासेबंद यांच्यासह स्थानिक महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतलेत. याप्रसंगी गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहोळ्याचे दरम्यान प्रास्ताविक – संपदा सागर पासेबंद यांनी तर आभार प्रदर्शन – विद्या बद्रे यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button