मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक
‘शिवतीर्था’वरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई /11 जानेवारी : गुजराताला जोडण्याचे दीर्घ कालीन नियोजन सुरू आहे. मात्र महा पालिका आ पल्या ताब्यात असेल तर ते काहीही करू शकत नाहीत. महापालिका आपल्या ताब्यात असेल तर ते अदानीला जमीन देऊ शकत नाहीत, असा दावाही राज ठाकरे यांनी केला. तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जातोय. तुमची जमीन आणि भाषा संपली की तुम्ही संपलात. हेच त्यांना संपवायचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळीही असेच संकट होते. आता ते संकट तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, तुम्हाला कधी बाहेर काढतील हे कळणारही नाही. अशा परिस्थितीत ही निवडणूक होत आहे. आता ही शेवटची संधी आहे. आता चुकला तर सर्वच गमावाल. मराठी माणसांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एक व्हावे, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि. 11) मुंबईतील शिवाजी पार्कवरुन केले. यावेळी गौतम अदाणींच्या 2014 नंतरच्याठ देशातील प्रकल्पांची यादी दाखवत, त्यांनी केंद्र सरकारसह राज्य् सरकारवर हल्ला्बोल केला.




