विकृतीचा कळस, महिलेसमोरच केले हस्तमैथून
अचलपूरच्या बोपापूरची घटना, आरोपीला अटक

अमरावती / 23 जुलै : एका भामट्याने विकृतीचा कळस गाठत रस्त्यातच महिलेसमोर हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार अचलपूर तालुक्यातील बोपापूर येथे घडला. पोस्ट मास्तर असलेल्या 27 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन समरसपूरा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. अक्षय कैलास कडू (28) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
तक्रारकर्ती महिला बोपापूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर पदावर कार्यरत आहे. पोस्ट ऑफिसपासून काही अंतरावरच अक्षय कडू याचा जनावरांचा गोठा आहे. महिला ऑफिसमध्ये जेथे बसते तेथील खिडकीतून अक्षय नेहमी वाईट नजरेने महिलेला न्याहाळत होता. सोमवारी तर अक्षयने त्याच्यातील विकृतपणाची परिसिमा पार केली. महिला काम आटोपून कार्यालयातून अचलपूरला जाण्यासाठी बाहेर पडली. बोपापूर बसस्टँडच्या मार्गाने ती जात असताना, एका बोळात अक्षय उभा होता. महिला तेथे पोहोचताच अक्षयने पँटची चेन उघडून आपला प्रायव्हेट पार्ट बाहेर काढला आणि महिलेसमोरच निर्लज्जपणे हस्तमैथून करण्यास त्याने सुरुवात केली.
या प्रकारामुळे महिला पुरती हादरुन गेली. लज्जा उत्पन्न होण्यासोबतच ती भयभीतही झाली. महिलेचे आपल्याकडे लक्ष जावे म्हणून मुद्दाम तो खोकलत होता. महिलेने स्वत:ला सावरुन कुणालातरी फोन करण्यासाठी पर्समधील मोबाईल काढला, तेव्हा घाबरुन आरोपी अक्षय कडू तेथून पसार झाला. त्यानंतर महिलेने समरसपूरा पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ बोपापूर येथे जावून आरोपी अक्षय कडूला अटक केली. गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याची अमरावती कारागृहात रवानगी केली आहे.




