प्र.कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांचे हस्ते अतिथीगृहाचे भूमिपूजन

डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे

अमरावती /16 डिसेंबर : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील ग्रंथालय परिसरात संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबू इंगोले यांचे अध्यक्षतेखाली व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांचे शुभहस्ते मंगळवार, दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी पालक व विद्यार्थ्यांचे निवासासाठी अतिथीगृहाचे भुमिपूजन पार पडले.
या अतिथीगृहात विद्यार्थ्यांचे पालक तसेच महाविद्यालयीन उपक्रमांसाठी येणा-या अतिथींसाठी निवासाचे प्रश्न लक्षात घेऊन आधुनिक सुविधा असलेले अतिथीगृह उभारले जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्याचे उदिष्ट प्रशासनाने व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन, हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सन्माननिय पदाधिकारी व सदस्य सर्वश्री अ‍ॅड. गजाननराव पुंडकर, अ‍ॅड. जयवंत उपाख्य भैय्यासाहेब पाटील, केशवराव मेतकर, सचिव डॉ. विजय ठाकरे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवन टेकाडे, प्रा.डॉ. के. वाय. विल्हेकर, डॉ. पी. आर. सोमवंशी, डॉ.पी. आर. भिसे, डॉ. आर. आर. सोनी, डॉ.ए.व्ही. डफळे, डॉ.एस.एस.पांडे, डॉ.पी.पी.तोरकडी, डॉ.डी.जी. विधळे, डॉ. के.ए. बनसोड, डॉ. ए. के. जावरकर, डॉ.पी. के. कुटे, डॉ.ए.जी. काळबांडे, डॉ.व्हि.आर. वासनिक, डॉ. एम. एम. देशमुख, डॉ. आर. आर. खोरगडे, डॉ. एस. आर. निर्मळ, डॉ.एस.सी. मोहोड, डॉ. श्रीकांत फुटाणे तसेच संस्था अभियंता वृषाली वानखडे, अंकुश बाकडे, राधिका होले, किशोर इंगळे, सुनिल देशमुख, नरेंद्र इंगोले, पुरूषोत्तम बाजड, ऋग्वेद देशमुख, श्रीकांत इंगळे, गौरव देशमुख, राहूल धांडे, राहूल लकडे, कॉन्ट्रॅक्टर तुषार नांदूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button