गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे संघर्षशील पालकांच्या परिश्रमाला मिळालेली खरी दाद
पत्रकारांच्या पाल्यांचा सन्मान : अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त समाजस्पर्शी उपक्रम

* खा.डॉ.अनिल बोंडे यांचे प्रतिपादन
अमरावती / 5 नोव्हेंबर – पत्रकारांच्या घरातील मुलांनी शिक्षणाच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून आपल्या कुटुंबाचा आणि पत्रकार समाजाचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या मेहनतीला आणि पालकांच्या अथक प्रयत्नांना मानाचा मुजरा देणारा असा उपक्रम समाजात सकारात्मकतेचा नवा संदेश देणारा ठरतो, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक मंडळ तसेच आपली मातृभूमी या वृत्तपत्रांचे प्रबंध संपादक अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या पुढाकाराने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोहळा अमरावतीत उत्साहात पार पडला.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल बोंडे, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, आणि युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिल अग्रवाल यांनी भूषविले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मानित विद्यार्थ्यांमध्ये -समिक्षा संजय शेंडे, भक्ति शशांक नागरे, प्रणय विजय धामोरिकर, पियुष प्रणय निर्बाण, गिरीजा संजय काथोडे, खुशी सुधीर केणे, रिधिमा पुरुषोत्तम चंदन, अथर्व संजय बनारसे, क्षितीज मंगेश वानखडे, विजया बंडू आठवले, जाई शशांक लावरे, प्रतीक गोपाल डहाके, सोहम मंगेश तायडे, वेदश्री अरुण जोशी, आर्यव्रत दिनेश खडसे, गौरी सुधीर भारती, आरुषी व वेदांत शशिकांत निचत, काव्या हेमंत निखाडे, सागर पुरोहित, आयुष प्रदीप बहुरूपी, श्रेया सचिन शेगोकार, अदिती आनंद रेलकर, प्राची विनोद इंगले, रोहित राजेश मालवीय, तनीशा राजेश मालवीय यांचा समावेश होता.
सन्मान सोहळ्यात प्रेक्षकांची दाद मिळवत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या यशाच्या कहाणीतून प्रेरणा पसरवली. सभागृहात उपस्थित पत्रकार व पालकांच्या डोळ्यात अभिमानाचे भाव झळकत होते.या प्रसंगी विजय ओडे, मंगेश तायडे, सुधीर भारती, प्रवीण शर्मा, बंडू आठवले, हेमंत निखाडे, युवराज उमरेकर, अतुल उजैनकर, प्रेम कारेगांवकर, विनोद नांदूरकर, भरत चिराणिया, अनिल अग्रवाल (कपबशीवाले) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमातील ठळक बाबी-अध्यक्षस्थान – अनिल अग्रवाल, मुख्य अतिथी – डॉ. अनिल बोंडे, विशेष उपस्थिती – पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, मार्गदर्शक सुनील राणा, प्रास्ताविक – प्रा. डॉ. लोभस घडेकर, सूत्रसंचालन – प्रफुल्ल घवळे, आभारप्रदर्शन – संजय बनारसे
कार्यक्रमानंतर सर्व पत्रकार बांधव, विद्यार्थी व पालकांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला.या स्नेहभोजनाने ‘पत्रकार म्हणजे एकत्रतेचं प्रतीक’ ही भावना पुन्हा अधोरेखित झाली.
शेवटचा शब्द-अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेला हा उपक्रम केवळ सन्मान सोहळा नव्हता, तर पत्रकार समाजाच्या संवेदनशीलतेचं आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीचं प्रतिक होता. पत्रकारांच्या मुलांचा गौरव म्हणजे त्यांच्या पालकांच्या संघर्षकथेला दिलेला सन्मान – आणि याच सन्मानातून समाजात उमलते एक नवं, प्रेरणादायी पान.
अग्रवाल कुटुंब पत्रकारितेतील मूल्यनिष्ठ परंपरेचं प्रतीक आहे. जुगलकिशोरजी अग्रवाल यांनी ‘अमरावती मंडळ’ सुरू करताना जे तत्त्व पाळले, त्याच मूल्यांवर आज हे दैनिक उभं आहे. समाजाच्या विश्वासाचं अधिष्ठान मिळवणं हीच खरी पत्रकारिता.
खा.डॉ. अनिल बोंडे
पत्रकारांच्या मुलांचा गौरव म्हणजे समाजातील चांगुलपणाचा उत्सव आहे. अशा उपक्रमांमुळे सकारात्मक ऊर्जेला चालना मिळते.
सुनील राणा
समाजसेवी
पत्रकार आणि पोलिस दोघंही समाजासाठी अहोरात्र काम करतात. त्यांच्या घरातील मुले यशस्वी होत असतील, तर तो समाजासाठीही प्रेरणादायी संदेश असतो.
अरविंद चावरिया
पोलिस आयुक्त
पत्रकारांच्या मुलांनी एमपीएससी, यूपीएससी, अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रांत प्राविण्य मिळवणं हा अभिमानाचा क्षण आहे. मेहनत, जिद्द आणि सातत्य हेच यशाचं गमक आहे. कोणतेही कार्य लहान नसते; प्रामाणिकपणा आणि नम्रता हाच खरा सन्मान.
संपादक अनिल अग्रवाल




