श्री शिवाजी कृषी महाविद्यालय व अमरावती गार्डन क्लबतर्फे पुष्प प्रदर्शनीचे उद्घाटन

अमरावती /26 डिसेंबर : शिक्षणमहर्षी व कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या वतीने आयोजित तसेच अमरावती गार्डन क्लब यांच्या सहकार्याने पुष्प प्रदर्शनी-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रदर्शनी बॅडमिंटन हॉल, शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे दिनांक 26 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत भरविण्यात आली आहे.
पुष्प प्रदर्शनीचे उद्घाटन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. उद्घाटक म्हणून निर्मलाताई देशमुख, कार्यकारी सदस्या, इंडियन रोज फेडरेशन तसेच माजी अध्यक्षा व सल्लागार, अमरावती गार्डन क्लब उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून हेमंत काळमेघ, कार्यकारिणी सदस्य, शिक्षण संस्था अमरावती व समिती अध्यक्ष, पुष्प प्रदर्शनी-2025 यांनी उपस्थिती दर्शविली. सामाजिक कार्यकर्त्या प्रेरणाताई इंगोले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्याला चंद्रशेखर देशमुख, प्राचार्य, शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय व अध्यक्ष, अमरावती गार्डन क्लब, डॉ. नंदकिशोर चिखले, प्राचार्य, शिवाजी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, अभय ढोबळे, प्राचार्य, रूरल इन्स्टिट्यूट, राजेश खाडे, प्राचार्य, जनता कृषी महाविद्यालय तसेच डॉ. समीर लांडे, प्राचार्य, शिवाजी कृषी महाविद्यालय व सचिव, आयोजन समिती, पुष्प प्रदर्शनी-2025 यांची उपस्थिती होती. ही पुष्प प्रदर्शनी एकूण 14 विविध गटांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये विविध फुलझाडे, कॅक्टस, बोन्साय, कोलीयस, हँगिंग बास्केट यांसह आकर्षक व माहितीपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी ही प्रदर्शनी ज्ञानवर्धक ठरत आहे.पुष्प प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक मानवेंद्र देशमुख, प्रभारी पुष्प प्रदर्शनी केशव ठाकूर, विभागप्रमुख उद्यानविद्या विभाग, डॉ. प्रकाश साबळे, सचिव पुष्प प्रदर्शनी तसेच डॉ. सुनील इंगळे, डॉ. मीना कोचे, मनोज नवरे, संजय वानखडे व प्रमोद वानखडे यांनी विशेष परिश्रम घेतले.




