अ.भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेचा पहिला दिवस खेळाडूंनी गाजविला

अमरावती /2 फेब्रुवारी : श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे सुरू असलेल्या ’अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेत पहिल्या दिवशी विविध संघांच्या खेळाडूंनी मैदान गाजविले. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य क्रीडांगणासोबतच मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अशा पाच ठिकाणच्या क्रीडांगणावर सॉफ्टबॉल स्पर्धेचे सामने सुरू आहेत. पहिल्या दिवशीच्या स्पर्धेत कर्नाटक विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, भोपाळ विद्यापीठ, बिकानेर विद्यापीठ, सौराष्ट्र विद्यापीठ, एम.डी.यू. विद्यापीठ रोहतक, चरणसिंह मेरठ विद्यापीठ, दुर्ग विद्यापीठ, तंतिया विद्यापीठ, राजस्थान, मुंबई विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, एसके अनंतपुरम विद्यापीठ, राजस्थान विद्यापीठ, जयपूर, मणिपूर विद्यापीठ, एलपीयू विद्यापीठ, बास्टर विद्यापीठ, एमडीएसयू अजमेर विद्यापीठ, डॉ. एपीजे कलाम विद्यापीठ, गुरू जम्भेार विद्यापीठ, मुरादाबाद, अण्णा विद्यापीठ, रायपूर विद्यापीठ, संजिवनी विद्यापीठ, राजा महेंद्र प्रतापसिंह अलिगढ विद्यापीठ, हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात पाटण विद्यापीठ, गोंडवाणा विद्यापीठ, गडचिरोली, गुरुकुल कंगारी विद्यापीठ हरिव्दार, मैसूर विद्यापीठ, कर्नाटक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठांच्या संघाने विजय मिळविला.




