प्रभाग 19 साईनगरमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ

माजी खा.नवनीत राणा यांच्या हस्ते साई मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात

अमरावती /5 जानेवारी : अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 19, साईनगर येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ रविवारी पार पडला. युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन ओंकारराव भेंडे (निवडणूक चिन्ह – पाना), उदय गुलाब पर्वतकर (निवडणूक चिन्ह – पाना) तसेच पक्षाच्या समर्थित उमेदवार गौरी अमोल इंगळे (निवडणूक चिन्ह – शिट्टी) सरिता सौरभ मालानी यांच्या प्रचाराचा नारळ माजी खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते साईनगर येथील साई मंदिरात सर्व जनतेच्या साक्षीने फोडण्यात आला. या वेळी प्रभागातील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत तिन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद व आशीर्वाद दिला. साई मंदिर परिसरात युवा स्वाभिमान पक्ष जिंदाबाद, पाना-पाना, विकासाचा बाणा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रचाराच्या प्रारंभी माजी खासदार नवनीत राणा यांनी महाआरती केली आणि साईबाबांच्या चरणी प्रार्थना करून उमेदवारांच्या विजयासाठी आशीर्वाद मागितले. त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात सर्वांगीण विकासाची ठोस दिशा मिळाली असून, ती पुढे नेण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार कटिबद्ध आहेत. सचिन भेंडे, उदय पर्वतकर आणि गौरी इंगळे यांनीही नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Back to top button