गायक मोहन इंगळे प्रस्तुत भक्तिसंगीतचे आयोजन

अमरावती /25 जानेवारी : श्री समर्थ सदगुरू भिकारामजी महाराज यांच्या प्रगट महोत्सवानिमीत्य आष्टा गाव वडाळा येथे दिनांक 29 जानेवारी 2026 रोज गुरुवार संध्याकाळी सात वाजता सुप्रसिद्ध पार्श्व गायक संगीतकार प्रबोधनकार अनेक पुरस्काराचे मानकरी असलेले आणि नुकतेच श्री गजानन महाराज हायस्कूल इथून मुख्याध्यापक प्राचार्य पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले भावस्वरांजली संचाचे डायरेक्टर संगीतकार, तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे माजी सिनेट सदस्य अनेक सीडी कॅसेट डीव्हीडीचे प्रस्तुत कर्ता, कृष्ण माझा मला सांग या मराठी चित्रपटात अभिनय गीतकार संगीतकार व गायक म्हणून सेवा दिलेले, आणि 5117 वा संत भिकाराम महाराज मंदिर आष्टा गाव येथे आयोजित केलेल्या विक्रमी समाज प्रबोधनात्मक भक्ती संगीत कार्यक्रम सादर करणारे मोहन इंगळे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
गायक मोहन इंगळे यांच्यासोबत भावस्वरांजली संचातील कलावंत निवेदन दिलीप भाऊ सरदार, ऑक्टोपॅड संतोष जी मानकर गायिका कुमारी कामिनी खैरे ऑर्गन प्रवीण जोंधळे तबला सुशील भाऊ ,ढोलकी कुलदीप चावरे हे साथसंगत करतील. पंचक्रोशीतील संगीत प्रेमींनी भिकाजी महाराज प्रेमींनी भक्तांनी रसिकांनी समर्थ सदगुरू संत भिकाजी महाराज जन्मोत्सव सप्ताहातील विविध कार्यक्रम, किर्तन, काल्याचे किर्तन, महाप्रसाद व भावस्वरांजली भक्तिसंगीत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे भिकाजी महाराज मंदिर आष्टा (वडाळा) गावचे ट्रस्टी विश्वस्त पदाधिकारी पुजारी तसेच सेवाधारी विष्णू भाऊ गवार्ले,चंदू भाऊ पावडे यांनी केलेले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button