पथ्रोट जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस वाढणार
इच्छकांची सख्या वाढली

पथ्रोट /12 डिसेंबर – जिल्हा परिषद सदस्य पद हे सर्वसाधारण असून महिला पुरुष आणि तेही सर्वसाधारण उभे राहू शकत असल्याच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणाची नवीन मांडणी होणार आहे. भाजपा काँग्रेस, शिवसेना ठाकरे व अपक्ष उमेदवारांची सक्रियता यांच्या हालचालीमुळे रिींहीेीं जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे कोर्टाच्या निर्णयाने थोडे दिवस स्थगिती झाली असती तरी नेते कार्यकर्ते व उमेदवारीची निश्चिती या कारणाने सर्व सक्रिय आहेत.
जिल्हा परिषद क्षेत्रातील एकूण मतदार संख्या पाहता जातीय समीकरणावर व जिल्हा परिषद सदस्यांच्या उमेदवाराच्या जोडीला पंचायत समिती सदस्य उमेदवार निश्चित करण्यात येतील दोन्ही पंचायत समिती उमेदवार जोडीला वजनदार असतील तर विजय प्राप्त करता येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाबद्दल असलेल्या निर्णयानंतर निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो भाजप मधून सुधीर रसे ,समीर हावरे, अतुल वाट, हे उत्सुक असून काँग्रेसमध्ये उमेदवारी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती वासंती ताई मंगरुळे हे फिक्स असल्यामुळे त्यांची चर्चा रिींहीेीं जिल्हा परिषद सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे . तर शिवसेना उबाटा कडून सृष्टी वाघमारे, संदीप लव्हाळे, अश्विन नागे. निवडणुकीच्या लढतीत आहेत. तथा रयत चे राहुल कडू हे सुद्धा निवडणूक रिंगणात करणार आहे. स्थानिक नागरिक कार्यकर्ते नेते सक्रिय झाल्यास प्रमुख पक्षांचे गणित बिघडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिसत असलेल्या तिरंगी लढतीत स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारावर निवडणूक होऊ शकते. पथ्रोट मधील विकास कामे तसेच दहा वर्षातील झाल्याच्या कामावर आणि अपयशी ग्रामपंचायत व इतर सहकारी संस्था यातील केलेल्या भ्रष्टाचारा वर राळ उठू शकते. नागरिकांचा थेट सहभाग आणि स्थानिक मुद्द्यावर निवडणुकीचे रंगत राहणार आहे. वाढते राजकीय वातावरण पाहता येणार्या निवडणुकीत जिल्ह्याचे लक्षवेधी पथ्रोट जिल्हा परिषद रणांगण ठरण्याची शक्यता आहे. विकास कामावरून मोठ्या प्रमाणात श्रेयवाद निवडणुकीत पुढे येऊ शकतो.




