माडू नदीपात्रात 63 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
घातपात की आत्महत्या, नागरिकांमध्ये चचा

मोर्शी। 13 ऑगस्ट – मोर्शी येथून जवळच असलेल्या श्रीशेत्र सालबर्डी येथील माडू नदीच्या पात्रात एका 63 वर्षीय इसमाचे प्रेत माडु नदीच्या पात्रात एका खडकावर आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही घटना आज दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताचे सुमारास उघडकीस आली.सदर घटना मध्यप्रदेश हद्दीत आठनेर पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्यामुळे सदर युवकाचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध मध्यप्रदेश पोलीस घेत आहे.मृतक युवकाचे नाव सुभाष किसनराव चर्जन वय 63 वर्ष रा. ग्रामीण रुग्णालयाजवळ चांदूरबाजार असे आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार चांदूरबाजार येथील सुभाष किसनराव चर्जन वय 63 वर्ष हे एम एच ए पी 39 46 या प्लेझर मोपेड गाडीने श्रीशेत्र सालबर्डी येथे दि.12 ऑगस्ट रोजी देवदर्शनासाठी आले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मात्र आज त्यांचे प्रेत सालबर्डी येथून वाहणार्या माडू नदीच्या पात्रात असल्याची माहिती मोर्शी पोलिसांना मिळाली त्यांनी नातेवाईकांपासून घटना घडल्याची माहिती जाणून घेतली. शेवटी मध्यप्रदेश पोलिसांनी पुढील सोपस्कार आटोपून मृतकाचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून या घटनेप्रकरणी पुढील तपास आठनेर पोलीस करीत आहे.




