बाल शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांचे स्नेहसंमेलनाचे उद्घाटन थाटात

अमरावती /12 डिसेंबर : खापर्डे बगीचा स्थित आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रांगणात बाल शिक्षण मंडळाच्या भागीरथीबाई बाई कलंत्री बालक मंदिर, माई हर्षे प्राथमिक शाळा व बालक मंदिर ,आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा या सर्व शैक्षणिक शाखांचे स्नेहसंमेलनाचे उद्घाटन यश संजय खोडके यांच्या हस्ते प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तसेच पारश्री हॉस्पिटलचे संचालक मा. डॉ.श्रीगोपाल राठी सर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्ष मा . मनीषाताई आष्टीकर मॅडम व सचिव मा.अ‍ॅड. रचनाताई पिंपळगावकर मॅडम ,कोषाध्यक्ष मा. वंदनाताई कुळकर्णी मॅडम ,आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्या. मा. सोळंके मॅडम ,माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. आळशी मॅडम ,माई हर्षे प्राथ. शाळेच्या मुख्या. मा. विरूळकर मॅडम बाल शिक्षण मंडळाच्या निरीक्षिका मुक्ता सराफ मॅडम मंचावर उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी औक्षण करून लेझीमच्या तालावर उपस्थित मान्यवरांना मंचावर निमंत्रित केले . मान्यवरांच्या हस्ते हस्तकला प्रदर्शनीचे व विज्ञान प्रदर्शनी चे उद्घाटन झाले .विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मान्यवरांनी कौतुक करत शाबासकी दिली . पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले .मा. यशदादा खोडके यांच्या हस्ते त्यांनी शाळेला भेट दिलेल्या डिजिटल स्मार्ट इंटर अ‍ॅक्टिव्ह पॅनल चे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अंकुर व भरारी या हस्तलिखितांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते केल्या गेले. इ. दहावीत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केल्या गेला. कैवल्य खंडारे ह्या विद्यार्थ्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्या या खेळात प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला . एम .टी एस परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार या प्रसंगी घेण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button