रिद्धपूर मराठी विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा

पहिल्याच दिवशी 52 विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी

-कुलगुरु आवलगांवकर यांनी पदभार स्विकारला
अमरावती / 4 जुलै: रिद्धपूरच्या देशातील पहिल्या मराठी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला आहे. या विद्यापीठात पहिल्याच दिवशी 52 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतला. लवकरच त्यांच्या वर्गांना सुरुवात होणार आहे. मराठी विद्यापीठाचे पहिले कुलगुरु डॉ. अविनाश आवलगांवकर यांनी बुधवारी आपला पदभार स्विकारला. गेल्या 50 वर्षांपासून अखिल भारतीय महानुभव परिषदेकडून रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची केली जात होती. त्याला आता मूर्त रुप प्राप्त होत आहे.
रिद्धपूर हे भारतवर्षात महानुभव पंथाची काशी म्हणून ओळखले जाते. येथील गोपीराज ग्रंथालयात मराठी भाषेतील शेकडो हस्तलिखित ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने देशातील पहिले मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. कुलगुरु अविनाश आवलगांवकर यांनी सुत्रे स्विकारल्यानंतर लगेच ऑनलाईन प्रवेश पक्रिया सुरु करण्यात आली. विद्यापीठात प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. मराठी विद्यापीठात बदलत्या काळाला अनूसरुन विविध व्यावसायिक अभ्यासक्रमही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे कुलगुरु अविनाश आवलगांवकर यांनी सांगितले.
यावेळी अखिल भारतीय महानुभव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा, महंत नागराज बाबा, महंत गोपीराज बाबा, महंत वाईनदेशकर बाबा, महंत कृष्णराज बाबा, राघवेंद्र दादा बिडकर, सुभाष पावडे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी कुलगुरु आवलगांवकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. डॉ. सुनिता सांगोले, रजिस्ट्रार डॉ. केशव तुपे, डॉ. यशपाल गुळधे, राम राठोड, सतिश मानकर, सुजाता असुलकर, वैशाली झेले, अतुल पडोळे, राजू स्वर्गे, आयुश नांदुरकर, उज्वल कुचे, साहिल निरवारे यांचीही उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Back to top button