प्रतिकात्मक डान्सबार उभारून ठाकरे सेनेकडून निषेध
राजकमल चौकात कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

* नकली नोटांचा वर्षाव करून जोरदार घोषणाबाजी
अमरावती /11 ऑगस्ट : शिवसेना उबाठाच्या महानगर शाखेने सोमवारी स्थानिक राजकमल चौकात प्रतिकात्मक डान्स बार उभारला आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या छायाचित्रांवर बनावट नोटांचा वर्षाव केला. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा पुतळा राजकमल चौकात ढोल वाजवून ’नाच कदम नाच’च्या घोषणा देऊन दहन करण्यात आले. त्याच वेळी, प्रतीकात्मक डान्स बारला ’योगेशभाऊंचा डान्स बार’ असे नाव देऊन एक अनोखा निषेध करण्यात आला. शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख पराग गुढे यांच्या नेतृत्वात या आंदोलनात मनोज कडू, नरेंद्र पडोळे, आसावरी देशमुख, प्रदीप बाजड, प्रतिभा बोपशेट्टी, मनिषा टेंभरे, ज्योती औगड, वर्षा भोंडे, जयश्री कुर्हेकर, वैशाली विधाते, वंदना घुगे, प्रफुल भोजने, डॉ. निर्मळ, नितीन हटवार, प्रदीप वडतकर, अिेशन नागे, नरेंद्र फिसके, शुभम सपाटे, शैलेश पांडे, शंकरराव भेटाळू, प्रकाश रताळे, विजय खेसे, ऋषिकेश सगणे, विनोद काळे, प्रकाश रताळे, संतोष श्रीनाथ, शिवचरण नवलकर, विशाल महेंगे, टिल्लू तिवारी, इब्री शहा, सागर वाटाणे, टिल्लू शर्मा, आशिष वाटाणे, मनोहर कोथलकर, पवन बदरके, राजकुमार मते, बंडू यादव, डॉ. बेलसरे, प्रफुल्ल भोजने, प्रमोद कोहडे, गोपाल मोकलकर, संतोष गावंडे, शरद पाटील बोदडे, बंडू साउथ, नरेश वानखडे मुकींदा ठाकरे, ओंकार काळे, घनश्याम शिंगरवडे, गब्बर भाई पठान, संजय होले, बाळा साहेब राणे, पंकज पिंपळकर, डॉ. प्रमोद कठाळे, नाना देऊळकर, सुरेश जुनघरे, संदीप कणसे, सुनील कोंडे, प्रवीण हरमकर, विजय ठाकरे, सचिन ठाकरे, रामा सोळंके, अतुल सावरकर, जयंत इंगोले, प्रमोद धानोकर, वैभव मोहोकर, शिवराज चौधरी, दिलीप काकडे, संजय गोंडाणे, शकीलभाई, विनोदा शर्मा, नरेंद्र शेलके, डॉ. गिरी, बाला सावरकर, बाळा तळोकर, बाल्या शेळके, विनोद शर्मा आदी शिवसैनिक सहभागी होते.




