माजी आ.विरेंद्र जगताप यांच्या विरूध्द तहसीलदार संघटना संतप्त

जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

अमरावती /3 जुलै: माजी आमदार आणि काँग्रेस नेते वीरेंद्र जगताप यांनी महसूल अधिकार्‍यांशी गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने गुरूवारी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांना निवेदन दिले. या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, माजी आमदार प्रा.विरेंद्र जगताप यांनी त्यांना शिवीगाळ आणि फोनवरून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. शिष्टमंडळाच्या नेतृत्वात निवेदन देतांना असा उल्लेख करण्यात आला आहे की, कर्मचार्‍यांवर उद्घटपणे वर्तन करून अपमाणित करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये रोष पसरला आहे. त्यामुळे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात यावी. निवेदन देताना तहसीलदार विजय लोखंडे, तहसीलदार संजय गरकन, रवींद्र कानडजे, पूजा मातोडे, मयूर कळसे, अभय घोरपडे, रामदास शेळके, अजितकुमार येने, नायब तहसीलदार एन.एस.तिवारी, प्रभारी तहसीलदार मोर्शी व्ही.बी.वानखडे, प्रभारी तहसीलदार सुधीर धावरे, धारणीचे प्रदीप शेवाळे, पुष्पा दाबेराव, अिेशन जाधव, चांदूर रेल्वेच्या एसडीओ तेजश्री कोरे, मोर्शीचे एसडीओ प्रदीप पवार, अचलपूरचे बळवंत अरखराव आदी उपस्थित होते. काँग्रेस नेते विरेंद्र जगताप यांनी नायब तहसीलदार वसंत पखाले यांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर निवडणूक विभागात मूर्ख लोक बसले आहेत. आदेश नसून सुध्दा पखाले निवडणूक विभागात ठाण मांडून बसले आहेत. तसेच चांदूर रेल्वेच्या एसडीओ यांना सुध्दा सर्वांसमोर गलीच्छ भाषेत त्यांचा अपमान केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. माजी आमदार जगताप यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणासही जुमानले नाही. तुमच्यात हिंमत असेल तर 353 अंतर्गत गुन्हा दाखल करा. त्यामुळे तहसीलदार संघटनेमध्ये रोष पसरला आहे. यापुढे जगताप यांच्या फोनला प्रतिसाद न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button