तपोवनचे कार्य समाजासाठी भूषण : यश खोडके
दाजीसाहेब पटवर्धन यांच्या कार्यावरील व्याख्यानमालेचा शुभारंभ

अमरावती /5 डिसेंबर : पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग व नाकारलेल्या लोकांच्या विकासासाठी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन निर्मिती करून मागील 78 वर्षात हजारो कुष्ठ बांधवांना आनंद जीवनासोबत पुनर्वस्थित केले व त्यातून समाजातील मानवतावाद जिवंत ठेवल्याचे महत्त्व केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी व भूषणावह असल्याचे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता यश खोडके यांनी काढले.
पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचे स्वातंत्र्यपूर्वीचे स्वातंत्र्य आंदोलन मधील कार्य व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तपोवन या संस्थेच्या माध्यमातून समाजातील बहिष्कृत लोकांच्या पुनर्वसन आणि विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती नवीन पिढीला भावी म्हणून 28 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत महानगरातील 30 शाळांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्याचे उपक्रम मागील तीन वर्षापासून तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या कल्पकतेतून आणि मार्गदर्शनात सुरू करण्यात आला आहे. मागील दोन वर्षात तपोवन या व्याख्यान उपक्रमाच्या माध्यमातून 60 शाळा 246 शिक्षक व दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल या व्याख्यानाचा तिसर्या वर्षाचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन तपोवन येथील शांतीकुंज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तपोवन चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यश खोडके, बंड अँड सन्स संचालक रणजीत बंड सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. शोभा रोकडे समाजसेवक डॉ. गोविंद कासट आदी उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे नियामक समिती सदस्य जुबीन डोटीबाल अश्विन आळशी भिमराव ठवरे विद्याताई देसाई उपस्थित होते. संस्थेच्या महामना मालवीय विद्यालय व विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन चा हा संयुक्त उपक्रम मागितली तीन वर्षापासून यशस्वीपणे सुरू आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या स्वागत सत्कार शाल स्मृतिचिन्ह पुस्तक देऊन तपोवन चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई सचिव सहदेव गोळे उपसचिव ऋषिकेश देशपांडे उपअधीक्षक योगेश करडे दीपक राजनहिरे महादेव कांबळे यांच्यासह संस्थेतील बहुसंख्य कार्यकर्ते विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते.




