अल्पभूधारक युवा शेतकर्‍याची आत्महत्या

गळफास घेतला, तिवसा येथील घटना

तिवसा / 21 जुलै : तिवसा शहरातील रहिवासी असणार्‍या एका 29 वर्षीय युवा अल्पभूधारक शेतकर्‍याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी, दुपारी 4 वाजता सुमारास उघडकीस आली. रुपेश प्रभाकरराव वानखडे असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी रुपेशने आई, वडिलांना मोझरी येथे जाण्यासाठी तिवसा शहरातील पंचवटी येथून एसटीबसमध्ये बसवून दिले. त्यानंतर काही मित्रांना भेटून रुपेश घरी परतला. अशातच घरी कुणी नसताना त्याने दुपारच्या सुमारास दोरीच्या साह्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह उत्तरीस तपासणीसाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. रुपेश वानखडेने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिवसा पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button