विष प्राशन करुन इसमाची आत्महत्या

असदपूर येथील धक्कादायक घटना

असदपूर / 18 नोव्हेंबर – शेतमजुरीचे काम करणार्‍या इसमाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना 17 नोव्हेंबर रोजी असदपूर येथे घडली. विनोद हरीचंद नितनवरे, वय-51 असे मृतक इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार विनोद नितनवरे हे 17 नोव्हेंबर रोजी शेतात गेले असता त्यांनी सोबत आणलेले विष घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती समजताच कुटुंबियांनी त्यांना अचलपुर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॅाक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यु झाला असल्याचे समजले. विनोद नितनवरे शेतमजुरी करुन आपला परीवाराचा उदरनिर्वाह चालवित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले, बहीणी असा आप्तपरीवार आहे. नितनवरे यांनी आत्महत्या का केली याची अद्याप माहिती समोर आली नाही. त्यांनी अकस्मात टोकाचे पाऊल घेतल्याने नितनवरे परीवार उघडयावर आला आहे. अकस्मात मृत्युमुळे गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button