विद्यार्थिनीची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या
कारण गुलदस्त्यात

दर्यापूर /6 ऑक्टोबर – शहरापासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शिवर गावात, वर्ग बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनी रात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार (दि. ६) सकाळी उघडकीस आली. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत विद्यार्थ्येचे नाव सोनल विनोद इंगळे (वय १६) असून, ती रा. शिवर, दर्यापूरची राहणारी होती. घरातील सदस्य झोपले असताना सोनलने छताच्या लोखंडी कळील साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करीत नोंद केली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार पार पडले. ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनिष दुबे पुढील तपास करीत आहेत. सोनलच्या मागे आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे; तिचे आई-वडील शेतीमजूरी करतात.




