सृजलची विेशविक्रमाकडे वाटचाल
अमरावतीच्या विद्यार्थ्याला सायकलींग असो.कडून शुभेच्छा

* कन्याकुमारी ते श्रीनगर 3652 किमीचा प्रवास सुरू
अमरावती /6 ऑक्टोबर: विदर्भ महाविद्यालयाचा 16 वर्षीय विद्यार्थी सृजल प्रवीण कोहळे याने रविवारी कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत 3,652 किमीचा प्रवास पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. या प्रवासासाठी त्याने सायकलिंग निवडले असून, तो एक नवीन जागतिक विक्रम करण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. अमरावती येथील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आणि सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, तसेच पदाधिकारी अतुल कलमकर यांनी त्याला पुष्पहार घालून साहसी सायकलिंग प्रवासाला निरोप दिला आणि शुभेच्छा दिल्या. डॉ. कुलकर्णी आणि कलमकर यांच्या सहकार्यांसह या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, जर सृजल कोहळे यांनी विक्रमी वेळेत हा प्रवास पूर्ण केला, तर ती संपूर्ण अमरावतीसाठी अभिमानाची बाब ठरेल.




