‘नमो युवा रन’ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमोचे आयोजन

* ड्रग्जमुक्त मोहिमेच्या थीमवर सेवा पंधरवाडाचे आयोजन
अमरावती /1 ऑक्टोबर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत संपूर्ण भारतभर सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येतो. भाजप अमरावती शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विकी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भव्य नमो युवा रन (नशा मुक्त भारत) मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत पुरुषांसाठी 5 किमी आणि महिलांसाठी 3 किमी अंतर निश्चित करण्यात आले होते. पुरुष आणि महिला दोन्ही गटातील विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रे देण्यात आली.
यावेळी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे आणि भाजपा शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले आणि राष्ट्रगीताने स्पर्धेची सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. अनिल बोंडे यांनी त्रिवेणी फाउंडेशनच्यावतीने विजेत्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला भाजप नेते रवींद्र खांडेकर, अॅड. प्रशांत देशपांडे, बादल कुलकर्णी, राधा कुरील, ललित समदूरकर, चेतन पवार, विक्की शर्मा, सुरेखा लुंगारे, श्रद्धा गेहलोत, संजय नरवणे, राजू कुरील, संजय तिरथकर, कीर्ती सराफ, प्रवीण पाटील, अॅड. शुक्ल पाटील, अॅड. साहू, उमंग मोंगा, अनिकेत तरवाणी, भूषण हरकुट, श्रावण मेहरे, विजय चावला, योगेश श्रीवास्तव, अनुप पुंड, यश शर्मा, रुपेश गुप्ता, अमोल, ऋषिकेश तेलकर, सुमित गुल्हाने, तुषार अंभोरे, रोहित गुप्ता, सनी दुधवानी, शुभम वान्हेकर, विकास सुने, अथर्व पांडव, राम कुंभारकर, साहिल शर्मा, वैभव धंदर, साहिल बुंदेले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत महिला गटातून पहिले पारितोषिक वैष्णवी वानखडे हिने जिंकले. पुरुष गटातून मीनाक्षी खरपाटे यांना दुसरे, संजल बनकर यांना तिसरे, समीक्षा आमझारे यांना चौथे, पायल मगराडे यांना पाचवे आणि स्वाती ठाकरे यांना सहावे बक्षीस देण्यात आले. तर पुरुष गटातून प्रथम बक्षीस नितीन हिवराळे यांना, द्वितीय बक्षीस प्रतीक गेडाम, तृतीय बक्षीस उझेर खान, चौथे बक्षीस क्रिश राणे यांना, पाचवे बक्षीस मुकेश उईके यांना आणि सहावे बक्षीस गौरव इंगळे यांना देण्यात आले. अतुल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष सहकार्य केले.
भाजपा मेडिकल सेल अमरावती जिल्हा-शहर समन्वयक डॉ. राधा सावडेकर, सचिव डॉ. सागर धनोडकर आणि त्यांच्या टीमने प्रथमोपचार देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे संचालन भाजपा अमरावती शहर सरचिटणीस श्री. बादलजी कुलकर्णी यांनी केले. भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष विक्की शर्मा यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.




