सोयाबीन तेल चोरीचा उलगडा : 5 आरोपी गजाआड

21 पिपे तेलाची खेप जप्त

-फ्रेजरपुरा पोलिसांची धडक कारवाई
अमरावती / 27 ऑगस्ट : नांदगावपेठ पोलिस ठाणे हद्दीतून तब्बल 24 पिपे सोयाबीन तेलाची खेप चोरून नेण्याच्या धाडसी चोरीचा उलगडा अखेर फ्रेजरपुरा पोलिसांनी केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीदरम्यान पोलिसांनी महादेव खोरी परिसरातील अक्षय वानखडेच्या घरावर छापा घालून चोरीस गेलेल्या खेपेमधील 21 पिपे तेल ताब्यात घेतले.
या कारवाईत अक्षय वानखडे, सक्षम प्रकाश सोलंके (19, महादेव खोरी), नीरज प्रवीण नेवारे (समाधान नगर), श्रवण राजेश बनारसे (19) आणि मयूर उर्फ एमडी अनिल डोंगरे (19, दोघेही महादेव खोरी) यांना पोलिसांनी जेरबंद केले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सर्व आरोपींना जप्त मालासह नांदगावपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे व सहाय्यक आयुक्त कैलाश पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोशन शिरसाठ, पोलिस निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय राहुल महाजन, एएसआय योगेश श्रीवास व इतर पथकातील शिपाई यांनी ही चोरी उघडकीस आणली.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button