घुसरवाडी येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह संपन्न

अमरावती/25 फेब्रुवारीखोलापुर येथुन जवळ असलेल्या श्री महर्षी वाल्मिकी पायी दिंडी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या नेतृत्वाखाली भागवताचे 21 ते 28 फेब्रुवारी पर्यंत श्री सुनिलभाऊ जिवणराव घावट यांच्या प्रांगणात महिला भजण मंडळ व गावकरी मंडळी घुसरवाडी यांच्या व्दारे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह संगित व दृष्यासह तथा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.
दैनंदिन कार्यक्रम म्हणून सकाळी काकडा आरती, हनुमान चालीसा, गीता पाठ व त्याच प्रमाणे भागवताचार्य ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या मुखारविंदाव्दारे सकाळ व दुपारला भागवत कथा, आणी सायंकाळी हरिपाठ आयोजित केला आहे. शनिवार 27 मार्चला दुपाला 4 वाजता वाजेपर्यंत गावातुन भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. आणी रविवार 16 मार्चला सकाळी भागवताचार्य श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील खालखोनीकर यांचे गोपाल काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाने सांगता करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पेटीवादक:- ह.भ.प. दिपकराव मानकर रा सायत, तबलावादक तथा मृदंगाचार्य:- ह.भ.प. सार्थक महाराज गाळे खालखोनी, विणेकरी:- ह.भ.प. रामेश्वर महाराज घावट, ह.भ.प. पंढरी महाराज घावट गायणाचार्य:- ह.भ.प तन्मय महाराज झासकर रा-खोलापुर, ह.भ.प. युवा किर्तनकार विशाल महाराज वाकोडे रा आपातापा, ह.भ.प.शिवदास घावट घुसरवाडी व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. अशी माहिती महिला भजण मंडळ घुसरवाडी व ह.भ.प. व श्री. सुनिलभाऊ जिवणराव घावट घुसरवाडी यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button