श्री वीर प्रताप नवदुर्गा मंडळाची नवरात्रीसाठी जय्यत तयारी
अध्यक्षपदी सागर चांडक, तरुणाईकडे कमान

-पारंपरिक उत्साहात होणार उत्सव
अमरावती / 16 सप्टेंबर : विदर्भभर आपल्या भव्य झांक्यांसाठी ख्यातीप्राप्त असलेल्या श्री वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडळाने यंदाही नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साह-उल्हासात साजरा करण्याचे ठरवले आहे. मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली असून तरुणाईकडे यावर्षी उत्सवाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
यंदाच्या कार्यकारिणीमध्ये सागर चांडक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर दैनिक अमरावती मंडलचे प्रबंध संचालक राजेश अग्रवाल यांची स्वागताध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. मंडळ प्रमुख म्हणून महेन्द्र कुमार चोपडा, सचिव म्हणून सुरेश शर्मा तर मंडळाचे संरक्षक म्हणून डॉ. चंदू सोजतिया यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी गौरीशंकर हेडा, प्रकाश उधवानी, संजय मुणोत, महेश बजाज आणि सुमित शर्मा यांची निवड झाली आहे. सहसचिवपदी विनय शर्मा, संजय उपाध्याय आणि विक्की पनीया यांची निवड झाली. कोषाध्यक्षपदी राजेंद्र जैन व संजय चोपडा, तर सहकोषाध्यक्षपदी नकुल डाबी, रीतेश आसोपा, गणेश तोष्णीवाल, पूजा अर्चना, मुरलीधर डोबा व प्रफुल्ल दवे यांची निवड झाली.
प्रसाद वितरणाची जबाबदारी गिरीश बजाज, जुगल दवे, श्याम वर्मा, संजय जैन आणि अशोक अंदुरे यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रचार समितीची धुरा महेश शर्मा, लक्ष्मीकांत खंडेलवाल, सुरेश रतावा आणि रोहित छांगानी सांभाळणार आहेत, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रसीकभाई जोगी, अविनाश पाटिल, राजेश ‘बल्ली’ साहू, विशाल राठी, अनिल गोगटे, केशव पुरोहित, गोपाल दायमाल, प्रवीण दायमा, गोविंद मालानी, अक्षय डोबा इत्यादींचा समावेश आहे.
सल्लागार समितीत पं. वसंत दवे, अॅड. प्रशांत देशपांडे, अॅड. प्रकाश चितलांगे, विनोद डागा व जुगलकिशोर पटेरिया आदींचा सहभाग राहणार आहे. त्याबरोबरच चंदू दायमा, मनोज कटारिया, सुरेश पांडे, पप्पू छांगाणी, नवल चांडक, श्याम शर्मा, ओम सोनी, राजू शर्मा, पं. करण पुरोहित, अशोक पुरोहित, अनुपम ठाकुर, अंकित हेडा, मोहन जडिया, राजेश शर्मा, भोपा महाराज, हरीश खिवंसरा, अनिल भाटी, दीपक चोपडा, अमन मावसकर, संजय मुथा, मनीष हिरोडे, सुनील गुप्ता, पुष्पराज शर्मा, बाबू कडेल, राजू उज्जैनकर, जीतू व्यास, दिलीप हरसोडिया, शैलेश लुल्ला, मनोज जोगी, प्रमोद चोपडा, प्रवीण धानक, श्याम गुप्ता, राजेश व्यास, संजय केशवानी, पवन व्यास यांसारखे शेकडो सक्रिय कार्यकर्ते मंडळाशी संलग्न झाले आहेत.
-भव्य झांकी व पंडाल
या वेळीही मंडळाची नवदुर्गा झांकी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. पारंपरिक कलात्मकता व आधुनिक सजावटीचा संगम साधणारी झांकी यंदा अधिक भव्य करण्याचा मानस आहे. मंडळाकडून आकर्षक पंडाल उभारणी सुरू असून सर्व बाजूंनी तो आच्छादित करण्यात येत आहे. अमरावतीतील नवरात्रोत्सवाला रंगत आणणार्या या मंडळाच्या उत्साही कार्यकत्यांमुळे उत्सवात यंदाही चैतन्याचे आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवता येणार आहे.




