श्री शिवाजी शिक्षण संस्थेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

अमरावती/6 मार्च : राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या विशेष पुढाकारातून भाऊ साहेबांच्या नावाने संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री यांचे तसेच गृहराज्यमंत्री भोयर यांचे विशेष आभार मानण्यात आले आहे. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केलेल्या विनंती नुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पात अमरावती येथे भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील विज्ञान प्रदर्शनीय मध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बेंगळुरू येथिल खडठज व अमेरिकेतील छअडअ याठिकाणी भेट देण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना जाहीर केल्याबद्दल त्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ तसेच इतर पदाधिकारी यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे.




