कारागृहाचे अधिकारी-कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

अनेकांवर कारवाईची टांगती तलवार

* कारागृहात मोबाईल आढळल्याचे प्रकरण

अमरावती / 12 ऑक्टोबर – अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदी जनांजवळ मोबाईल आढळल्याने कारागृह प्रशासन वादाच्या विळख्यात आले आहे. या घटनेची माहिती राज्यभर पसरल्याने गुन्हे शाखा तसेच कारागृहातील वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी कारागृह अधीक्षकांकडून सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार्‍या काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू आहे. उल्लेखनीय असे की, अमरावती मध्यवर्ती कारागृहात गेल्या आठवड्यात चार दिवसांत आरोपींकडून सहा फोन जप्त करण्यात आले आहेत. यापैकी पाच मोबाईल अतिसुरक्षा असणार्‍या अंडासेलमधून जप्त करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर यापूर्वीही कारागृहात मोबाईल फोन आढळले आहेत. या दरम्यान हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने नागपूर आणि पुणे येथील वरिष्ठ पथकाकडून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान कारागृह सुरक्षा समितीने जेल अधीक्षकांना सुरक्षेच्या मुद्यावर झालेल्या दुर्लक्षाबद्दल कानउघाडणी केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर लवकरच कारवाईची टांगती तलवार कोसळणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button