भूकंपाच्या धक्क्याने हादरले शिवणगाव
खा. बळवंत वानखडे व आ.राजेश वानखडे यांचा ग्रामस्थांशी संवाद

* ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
तिवसा /24 नोव्हेंबर : तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर या गावाला काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. गावात भूकंपाचे धक्के बसण्याची ही तिसरी घटना असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या भूकंपाची माहिती मिळताच तिवसा तहसीलदार डॉ. मयूर खडसे यांनी रात्री 1 वाजता गावात भेट दिली तसेच आज दुपारी खासदार बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. तालुक्यातील शिरजगाव मोझरी व शिवणगाव या गावांना अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नुकतेच काही महिण्यापूर्वी शिरजगाव मोझरी गावात भूकंपाचे चांगलेच धक्के बसले असून घरातील भांडी कोसळली होती. त्यानंतर आज पुन्हा शिवणगावात सलंग दोन दिवस धक्के बसल्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आले आहे.तसेच यापूर्वी देखील ता. 17 रोजी दुपारी अश्याच प्रकारचे धक्के शिरजगाव मोझरी येथे बसले होते तर काल रात्री संपूर्ण गाव गाढ झोपेत असताना अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने अख्ख गाव जागी झाले होतें यावेळी ग्रामस्थांनी भीतीने रात्री मोठी गर्दी केली होती.यावेळी सकाळपासून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने आमदार राजेश वानखडे, तिवसा तहसीलदार डॉ मयूर कळसे, नायब तहसीलदार नरेंद्र कुराळकर,गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे,सरपंच धर्मराज खडसे, ग्रामपंचायत सचिव विनोद खडसे तसेच भाजपचे निलेश श्रीखंडे, प्रहारचे संजय देशमुख, काँग्रेस वैभव वानखडे, पंकज देशमुख, आकाश डेहनकर, जसबीर ठाकूर यावेळी उपस्थित होते. रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्याने संपूर्ण गाव भीतीच्या छायेत होतें.यावेळी प्रशासनाची तातडीने बैठक बोलवून याठिकाणी लवकरच भूकंप मापक यंत्र बसविण्याच्या सूचना दिल्या आहे.येत्या काही दिवसात यंत्र बसविण्याची कारवाई पूर्ण होईल.
-आ.राजेश वानखडे, तिवसा मतदार संघ.




