दिदम्दा येथे शिव नर्मदेश्वर मंदीर प्राणप्रतिष्ठा महोत्सव थाटात

अमरावती /16 मार्च – धारणी येथून जवळच असलेल्या दिदम्दा येथे शिव नर्मदेश्वर मंदिर प्राण प्रतिष्ठा महोत्सव नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी आदीवासी हिंदू सह हजारो भक्तजनांच्या उपस्थितीत मूर्तीची प्राणप्रतिष्ठासह अन्नवास, जलवास, भजन पूजन, किर्तन, अभिषेक व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमाचे दिदम्दा ग्रामवासी व पंचकमेटिच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. पंडीत अनंत शुल्काजी महाराज यांच्या हस्ते मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सर्वश्री अनारसिंग रावत, गोरेलाल रावत, बाबूलाल जावरकर, दिलीप रावत, ईश्वर पाटनकर, ईश्वर उईके, प्रेम पटोरकर, रामसिंग उईके, शेरसिंग मोरे, नवलसींग उईके, मोहन रावत, रमेश रावत, सुनिल चव्हाण, अंकीत मालविय , बुढा दारसिंबे, नंदु पारटे, सोनाजी जांभेकर, दशरथ पोरटे, हरीराम पेठेकर, आशिष पाटनकर, नंदकिशोर जांभेकर, हिराजी कास्देकर, करण रावत, रमेश मोरे, विजय ससाने, शिक्षक आडेश्वर तसेच विना जांबेकर, गौरी रावत, जानुबाई रावत, सुमन बारभे, संगिता पोटलकर, द्रौपदी उईके, लक्ष्मी उईके, रामरती उईके, सुमित्रा पटोरकर, जासो जांबेकर, रामरती पोरटे, सोनाबाई पोरटे, गायत्री पटोरकर, यमुना जांबेकर, मोनीका पटोरकर, राजवंती जांबेकर, कमला रावत, रामरती शितोळे, ममता शितोळे सह अनेकांनी ज्ञानयज्ञाचा लाभ घेतला. दिदम्दा येथील प्राणप्रतिष्ठा व धार्मिक कार्यक्रमाला उपेक्षित महासंघाचेवतीने प्रा.श्रीकृष्ण बनसोड, श्रीकृष्णदार माहोरे, इंजि. सुभाष गोहत्रे यांनी शुभेच्छा दिल्या.




