भजनी मंडळाच्या वेशात शिरखेड पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड
1 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त, 13 जुगार्यांना अटक

मोर्शी/१२ ऑगस्ट – शिरखेड पोलिसांनी धामणगाव येथील एका घरात भजनी मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि रोख रकमेसह एकूण १.५५ लाख रुपये जप्त केले. शिरखेडे पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धामणगाव या गावातील एका घरात गेल्या काही दिवसांपासून जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे अधिकारी सचिन लालू यांना मिळाली. मात्र, जुगारी त्यांची माहिती गावाच्या वेशीवर ठेवत असल्याने, पोलीस गावाजवळ येताच जुगारींना त्यांची माहिती मिळत असे. त्यामुळे त्या ठिकाणी छापा टाकणे कठीण झाले. धामणगाव या गावातील एका बंद घरात पुन्हा जुगार सुरू झाल्याची बातमी मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या आदेशानुसार ठाणेदार सचिन लुले यांनी भजन पथकाच्या वेशात येऊन जुगारींमध्ये संशय निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी गेले.गावात पायी प्रवेश करुन धाड टाकली असता एकुण 13 इसमांना 52 तास पत्त्यांवर जुगार खेळत असतांना ताब्यात घेतले.सदर धाडीमध्ये 7 न्डॉईड मोबाईल,1 साधा मोबाईल,1मोटर सायकल तसेच जुगार खेळण्याच्या खोलीमधील जुगाराचे साहित्य व नगदी असा 1,54,950/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांमध्ये रुपेश विनायकराव गावंडे वय 25 वर्षे, संतोष सदाशिवराव गावंडे वय 35 वर्ष, मोहन राजु बरडे वय 30 वर्षे,विक्की गजानन कनेर वय 22 वर्ष,रविंद्र मधुकर आकोलकर वय 41वर्षे,योगेश वासुदेवराव झगडे वय 30 वर्षे,देवेंद्र वासुदेवराव मानकर वय 25 वर्षे,रुपेश सुरेशराव ढाकुलकर वय 30 वर्ष, विजय पुंडलिकराव भुजाडे वय 38 वर्ष, मनोज सुधाकरराव वैराळे वय 39 वर्षे, विनोद रमेशराव वैराळे वय 39 वर्षे,सुनिल भाऊराव सुंदरकर वय 60 वर्ष,प्रज्वल विलासराव अमृते वय 23 वर्षे सर्व रा. धामणगाव काटसुर ता. मोर्शी जि.अमरावती यांचेवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक विशाल आनंद,अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सचीन लुले ठाणेदार पोलीस स्टेशन शिरखेड यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन शिरखेड येथील ग्रेड पोउपनि धुर्वे, पोहेकों सचीन भाकरे, निस्ताने,पोकों वैभव घोगरे,अमीत राऊत, मथुर कापडे व धिरज डोंगरे यांनी पार पाडली आहे.




