शेख अब्दुल यांचा आज पदग्रहण सोहळा
काँग्रेसच्या दिग्गज नेते राहणार उपस्थित

चिखलदरा / 8 जानेवारी : मेळघाटातील निसर्गरम्य चिखलदरा नगरपालिकेच्या नवनि र्वाचित नगराध्यक्षपदी शेख अब्दुल शेख हैदर यांचा पदग्रहण सोहळा आज, शुक्रवार 9 जानेवारी रोजी दुपारी ठीक 1 वाजता अत्यंत थाटात संपन्न होणार आहे. या मंगलमयी सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने चिखलदरा शहरात प्रभावी शक्तिप्रदर्शनाचे नियोजन केले असून, या सोहळ्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या युगाची सुरुवात होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख सपकाळ, अमरावतीचे खासदार बलवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप आणि ज्येष्ठ नेते राजकुमार पटेल या सारख्या राजकीय धुरं दरांची प्रमुख उप स्थिती लाभणार आहे. शेख अब्दुल यांच्या निवडीमुळे नगर पालिकेत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला आता नवी दिशा प्राप्त होणार आहे. नवनियुक्त नगराध्यक्ष आज पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील प्रलंबित नागरी समस्या, पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, स्वच्छता व्यवस्था, नियमित पाणीपुरवठा आणि जागतिक दर्जाचा पर्यटन विकास या विषयांवर ठोस पावले उचलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या सोहळ्यात नवीन तम्मन्ना शेख, जहीर शैलेंद्र पाल, शेख शबाना, शेख नासिर, रुपेश मोहनलाल चौबे, प्रमोद नाईक, रुपाली मनोज पाल, रमोती सावलकर, दयाराम रामू सावलकर, शिवकन्या राजेंद्र वरघट, निर्मला नरेश नवले, सुवर्णा विन्सेट चंदामी आणि स्विटी किरण कास्देकर हे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आपले सहकार्य दर्शविणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा हा सोहळा राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
चिखलदर्याचा सर्वांगीण कायापालट-शेख अब्दुल शेख हैदर यांच्या नेतृत्वाखाली चिखलदरा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. प्रलंबित प्रश्न निकाली काढून पर्यटन नगरीला आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज करण्यावर नूतन प्रशासनाचा विशेष भर असेल. सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या एकजुटीने आणि जनसामान्यांच्या विश्वासातून शहराच्या वैभवात भर टाकण्याचा संकल्प आजच्या या सोहळ्यातून व्यक्त केला जाणार आहे.




