सैन्यातील जवानाकडून महिलेचे लैंगिक शोषण

आक्षेपार्ह फोटोंद्वारे ब्लॅकमेलिंग

अमरावती / 20 जून: भारतीय सैन्यदलात जवान म्हणून कार्यरत असलेल्या युवकाने एका 39 वर्षीय महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून सुमारे पाच महिने लैंगिक शोषण केल्याची घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पिडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. निलेश अशोक वानखडे (34, रा. पवन नगर, नवसारी, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पिडित महिलेचा एक फ्लॅट भाड्याने द्यावायाचा होता. याची माहिती निलेश वानखडे याला मिळाल्यानंतर त्याने आपल्या मित्राला फ्लॅट भाड्याने द्यावायाचा आहे, असे सांगून फ्लॅट पाहण्याच्या बहाण्याने महिलेला 22 जानेवारी रोजी तेथे बोलावले. महिला फ्लॅट दाखविण्यासाठी आली. दोघेही फ्लॅटमध्ये गेल्यानंतर निलेशने आतून दरवाजा लावला आणि महिलेसोबत बळजबरी करुन शारीरिक संबंध स्थापित केले. यावेळी त्याने महिलेचे आक्षेपार्ह फोटोही काढले. घटनेची वाच्यता केल्यास कुटुंबियांना जिवे मारण्याची आणि स्वत: आत्महत्या करण्याची धमकी त्याने दिली.
त्यानंतर आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून निलेशने महिलेला ब्लॅकमेल करणे सुरु केल. त्याने सतत 5 महिने महिलेचे लैंगिक शोषण केले. दरम्यान हा प्रकार निलेशच्या पत्नीला माहिती पडला. तेव्हा निलेशने पत्नीला महिलेविरोधात खोटी माहिती देवून भडकवले आणि महिलेला फोन करुन संबंध तोडत असल्याचे सांगितले. निलेशच्या पत्नीने महिलेच्या घरी जावून तिच्याशी वाद घातला. मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. शिवीगाळ करुन मोहल्लयतून हाकलून देण्याची धमकी निलेशच्या पत्नीने पिडितेला दिली. त्यानंतर पिडितेने गाडगेनगर पोलिस ठाण्यात जावून याबाबत तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी निलेश वानखडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button