आत्मनिर्भर भारत हा संकल्प तळागळापर्यंत नेऊ
‘सांसद स्वदेशी मेळावा‘ उदघाटनप्रसंगी डॉ.अनिल बोंडे यांचे प्रतिपादन

वरुड । 10 ऑक्टोबर – भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात देश व राज्य प्रगती करत आहे. त्यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत हा संकल्प तळागळापर्यंत नेऊ, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड येथील संत्रा लिलाव मंडी येथे आज आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्मितीसाठी सांसद स्वदेशी मेळाव्याचे उदघाटन राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख होते. या प्रदर्शनीत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील 70 बचत गट समाविष्ट झाले असून या प्रदर्शनीत विविध गटांकडून तयार केलेली उन्हाळी वाळवट, नैसर्गिक उत्पादने, हस्तकला, कृषी आधारित व पर्यावरणपूरक उत्पादने पाहायला मिळाली. कौशल्यातून साकारलेली विशेष स्वदेशी उत्पादने, आपल्या दैनंदिन वापरातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ उत्पादने, स्वदेशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वदेशी कापड व साडी प्रदर्शनी, विविध हस्तकला, सजावट व कृषी उपयोगी उत्पादने, उद्योजकता मार्गदर्शन, उत्पादने प्रदर्शनी व विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रम या सर्वांचा या तीन दिवसीय प्रदर्शनीत समावेश आहे.
महिला भगिनींचे आर्थिक स्वावलंबन, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि समाजात ‘वोकल फॉर लोकल’ या विचाराची जनजागृती करणे हे या प्रदर्शनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकारातून या सांसद स्वदेशी मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्वदेशीचा मंत्र नवीन भारताची निर्मिती करतो आहे, असे या कार्यक्रमाचे प्रकल्प संयोजक तथा वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी सांगितले.
कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला, मार्गदर्शन केले व सहकार्य केले त्यांचे विक्रम ठाकरे यांनी यावेळी आभार मानले. कार्यक्रमाचे उदघाटक राज्यसभा खासदार डॉ. अनिलजी बोंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, कॅट विदर्भ प्रांत अध्यक्ष विनोद कलंत्री, सरचिटणीस तथा प्रभारी मोर्शी विधानसभा शंतनु देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्ञानेश्वर दाभाडे, उल्हास लेकुरवाळे, तहसिलदार रामदास शेळके, गटविकास अधिकारी खुशाल पिल्लारे, तालुका कृषी अधिकारी मुजावर, सहायक निबंधक डॉ. आशिष चर्जन, अमित कुबडे, गोपाल पांडे, राजेश गांधी, गिरीधर देशमुख, रूपाली सोंडे, जगदीश उपाध्याय, डॉ. शशिभूषण उमेकर, गोपालगिरी महाराज, अशोकराव देशमुख, मनोहर बारसे, भाग्येश देशमुख, विद्या भुंबर, विशाल सावरकर, निलेश फुटाणे, सुष्मा सरोदे, बबलू पावडे, बाबाराव मांगुळकर, तुषार निकम, राजकुमार राऊत, राहुल चौधरी तसेच जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेकडो बचत गटांची व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.




