श्री हव्याप्र मंडळाच्या 20 शूटर्सची निवड
68 व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सहभागी होण्याची संधी

अमरावती /9 डिसेंबर : येत्या 11 डिसेंबर 2025 ते 04 जानेवारी 2026 दरम्यान भोपाळ येथे रायफल शूटिंग व पिस्टोल शूटिंग दिल्ली येथे होणार्या 68 व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या शूटिंग रेंज विभागातील 20 शूटर्स ची निवड झाली. हे शूटर्स वेगवेगळ्या वयोगटातील असून आय एस एस एफ – सी सर्टिफाईड कोच राहुल उगले व सह प्रशिक्षक एन आय एस अभिषेक सिंघ यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत.
पात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये समर्थ वारे, टिया लोया, तनिष्का देशमुख, संस्कृती दीक्षित, रिया काळे, भूषण मिश्रा, जोत्स्ना आटला, इत्यादी पिस्टोल शूटर्स चा दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग आहेत. तसेच अतुल वडे, यश वेणी, सावी गुल्हाने, वेद जयस्वाल, ईशान घारू, अवनीश बावस्कर,रचित मेश्राम, छत्रपती घोगरे, वत्सल चव्हाण, गुंजन वानखडे, मंजिरी देशमुख, स्पर्श ठाकरे इत्यादी शूटर्स चा भोपाळ येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, मंडळाचे कार्याध्यक्ष एड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव प्रा. विकास कोळेश्वर, सचिव प्रा. रवींद्र खांडेकर, आनंद महाजन, डॉ. ललित शर्मा यांच्यासह सर्व पदाधिकारी व खेळाडू वर्गातर्फे स्पर्धत यशस्वी होण्याकरिता शुभेच्छा देण्यात येत आहे.




